Trending Video : प्रत्येकाच्या घरात (house) लहान मुलं (little children) असतं. या लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा त्यांचा जीवावर बेतू शकतं. अगदी घरातील एक एक वस्तू या मुलांपासून सांभाळून ठेवावी लागते. नाही तर ही मुलं कधी काय करतील याचा आपण अंदाज पण लावू शकतं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात नाशिकमधील (Nashik) एका चिमुरड्याने नेलकटर गिळलं (little boy swallowed the nail cutter) होतं. नशिबाने डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करुन ते नेलकटर बाहेर काढलं. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्या. 


सोशल मीडियावर (Social media) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतो आहे. तो पाहून तर अंगावर काटा येतो. जर तुमच्या घरात विहीर (well) असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल (swimming pool) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 


आपण लहान मुलांसोबत कधी स्विमिंग असलेल्या रिसार्टला (Resort) जातो. किंवा बिल्डिंगमधील स्विमिंगजवळ तुमचं लहान मुलं खेळतं असेल तर सावधान, पहिले ही बातमी नक्की वाचा! (trending video little girl fall in swimming pool on Social Media NM)


OMG ! आणि चिमुरडी स्विमिंग पूलमध्ये पडली...


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुरडी स्विमिंग पूलजवळ जाते आणि त्यात उडी मारते...अरे देवा, ती मुलगी डुबायला लागते...तेवढ्यात काही अंतरावर झोपाळ्यावर आराम करत असलेले तिचे वडील (father) धावत येतात आणि तिला उचलून घेतात...



या चिमुरडीचं नशिब बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला. पण पालकानो प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, त्यामुळे आपल्या मुलांकडे कटाक्षाने लक्ष द्या.