Ramp Walk Viral Video : अभिनेत्री प्रियंका चोपडा (priyanka chopra)आणि कंगना राणावत (Kangana Ranaut) यांचा फॅशन (fashion ) हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात रॅम्प वॉक करताना कंगनाचा ड्रेस फाटला होतो...अशी घटना खऱ्या आयुष्यातही एका मॉडेलसोबत घडली होती. त्यानंतर फॅशन जगतात एकच खळबळ माजली होती. एका फॅशन शोचा (fashion show video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले आहेत. जगभरात फॅशन डिझायनर्स (model video) आपल्या अनोख्या फॅशन आणि डिझाइन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड्स व्हायरल होतं असतात. हा फॅशन हो सध्या जगाचं लक्ष वेधून घेतं आहे. (Trending Video Models Had Clothes Falling at Milan Fashion Week Viral Video on Social media )


अन् तिच्या ड्रेसचे तुकडे तुकडे झाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॅशनच्या दुनियात नवीननवीन प्रयोग होत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता...रॅम्प वॉकवर एक मॉडेल ऊप्स मोमेंटचा (Oops Moment)शिकार झाली आहे. एक एक करुन मॉडल्स रॅम्प वॉकवर येतात आणि हे काय त्यांचा एक्सेसरीज तर कोणाची हील्स तुटून पडते...तरीही हा फॅशन शो सुरु असतो. त्यानंतर पुढील मॉडेल्स येतात आणि हे काय तिच्या ड्रेसचे तुकडे तुकडे होतात. तरीही ती थांब नाही चालत राहते. हा प्रकार तिच्यासोबत नाही तर इतर मॉडेल्ससोबतही घडतो. अगदी Male models चेही पॅन्ट फाटते. 


फॅशनची ही कोणती तऱ्हा?


हा विचित्र फॅशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ मिलन फॅशन वीकचा आहे. डिश डिझायनर बीट कार्लसन यांचा हा फॅशन शो होता. या व्हिडीओच्या शेवटी तर स्टेजवर एक बोर्ड पडतो आणि प्रेक्षकांना धक्काच बसतो. हा सगळा प्रकार या फॅशन शोचा एक भाग होता. अ‍ॅक्टिव्ह डिझायनरची ही कल्पना होती. फॅशनची विचित्र तऱ्हा पाहून प्रत्येक जण अवाक् झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by AVAVAV (@avavav)



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर  avavavandbeate.karlsson यावर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.