झोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्...; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO
Viral Video : वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, चिंपांझी हे मानवाचं सर्वात जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे गोरिलाचा मानवी बाळाशी खास नातं असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.
Viral Video : Baby's Day Out हा पिक्चर कोणा कोणाला आठवडतो. या चित्रपटातील चिमुकला जेव्हा ZOO मध्ये जातो. तेव्हा तो एका गोरिलाच्या मांडीत जाऊन झोपून जातो. सोशल मीडियावर असाच एका क्यूट गोरिलाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. वानर हे मानवाचे पूर्वज आहेत असं म्हणतात. त्यामुळे माकड, चिंपांझी, गोरिला यांचं अनेक गोष्टी मानवाशी जोडल्या गेल्या आहेत. भाविकदृष्ट्याही ते अनेक वेळा अशा गोष्टी करतात की आपण अवाक् होऊन जातो.
अन् गोरिला धावत गेला...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला त्याचा आईसोबत प्राणीसंग्रहालात आला आहे. हा चिमुकल्या आईच्या कुशीत झोपला होता. आई गोरिला पाहण्यासाठी थांबते तर गोरिला मोठ्या उत्सुकतेने आईच्या हातातील चिमकुल्याकडे पाहत असते. पण ती अचानक तिथून धावत निघून जाते. पुढे ती जे करते ते पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
जेव्हा गोरिला परत येते तेव्हा तिच्या हातात छोटंस बाळ असतं. महिलेच्या हातातील चिमुकलं पाहून गोरिलाला आपलं बाळ आठवतं आणि तो त्या बाळाला आणायला धावत जातं. गोरिला त्या महिलेला आपलं बाळ दाखवतं. त्याचासोबत खेळतं आणि प्रेम करत. मायेचं हे रुप पाहून प्रत्येक जण हळवं होतं आहे. गोरिला थोड्या वेळाने त्या बाळाच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेतं.
खरंच आई आणि मुलांचं नातं, त्यांच्या प्रेमाची कुठेही तुलना होऊ शकतं नाही. मग ते मानवी असो किंवा प्राण्यांचं...हत्ती, गाय, श्वान यांचे आपल्या पिल्लासोबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. (Trending video mother child gorilla remembered his baby heart melting video viral on Internet today google trend)
हेसुद्धा वाचा - Viral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरच्या Hipatia या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही आहे.
या व्हिडीओ पाहून नेटकरी कंमेट्स बॉक्समध्ये भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवला पाहिजे असा हा व्हिडीओ आहे.