Trending Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काहीच व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. इन्स्टाग्रामवरील हा धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकते. एका रहिवाशी बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. धुर आणि आगीचे लोट पाहिला मिळतात. इमारतीतील लोक तत्काळ खाली उतरले. ज्या घरात आग लागली आहे. त्या घरातील बाल्कनीत एक 5 ते 6 वर्षांच्या चिमुरडा मदतीसाठी हाक देतं होता. (Trending Video neighbors man save childs life rescue from apartment fire China video viral on Instagram today Trending news)


अग्नीतांडवात चिमुकल्या फसल्या अन् मग...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगी वाढतं होती, धुरेचे लोट त्याच्याकडे येत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या नागरिक अॅक्शन मोडमध्ये आलेत. त्यातील एकाने सिडी घेतली आणि तो वरती चढला. त्या घराच्या बाल्कनीला लोंखडी जाळी होती म्हणून त्या चिमुकल्याला बाहेर येणं शक्य नव्हतं. 


आता ती लोंखडी जाळी तोडण्यासाठी त्या व्यक्तीला कटर देण्यात आलं त्याने कसं बसं ती जाळी तोडण्याचा प्रयत्न सुरु होता. पण जाळी मजबूत असल्याने ती तुटत नव्हती. त्या मधील काही लोकांनी सिडी वरती चढवली. त्या सिडीवर चढून एका लोंखडी सळीने जाळी तोडण्याचा प्रयत्न सुरु केला. एकाने त्या व्यक्तीला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्प्रेस दिला. हे सगळं सुरु असताना आग वाढत होती. धुरीचे लोट त्या चिमुकल्याकडे सरकत होते. 


हेसुद्धा वाचा - किडनी निकामी, कुटुंबाकडून मदत नाही, ड्रग्ज घे...Sherlyn Chopra ने सांगितलं वेदनादायी कहाणी


पण त्या सगळ्यांच्या मदतीने त्या चिमुकल्या वाचविण्यात अखेर यश आलं. हा व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. ही धक्कादायक व्हिडीओ चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील झांजियांग शहरात आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील goodnews_movement या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकदा कलह आणि संकटाच्या काळात कोणाचीही साथ मिळतं नाही, असा घटना असताना या धाडसी आणि करुणेच्या कृत्याने मन भरुन येतं. आजही माणुसकी जिवंत आहे हे पाहून सकारात्मक भाव निर्माण होतात.