Viral Video: चिनी संस्कृती (Chine Culture) जगातील सर्वात प्राचीन (Ancient) आहे असल्याचं मानलं जातं. चिनी संस्कृतीत ड्रॅगन (Dragon) या प्राण्याचं विशेष महत्व आहे. चिनी लोकं ड्रॅगनची पूजाही करतात. त्यांच्या मते ड्रॅगनने चिनी लोकांना शक्ती, प्रतिष्ठा आणि बुद्धीचं भांडार दिलं. ड्रॅगन हा सर्व शक्तीमान तर आहेच पण उदार स्वभावाचाही आहे. त्यामुळे चिनी संस्कृतीत ड्रॅगनचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर वर्षी चीनमध्ये अनेक कार्यक्रमात ड्रॅगनची पूजा केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रॅगन नृत्य प्रसिद्ध
चिनी नवीन वर्ष (China New Year) हे साधारणतः 21 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान येणाऱ्या प्रतिपदेपासून सुरु होतं. नव्या वर्षात ड्रॅगन नृत्य करण्याची प्रथा आहे. परंपरेनुसार निरनिराळ्या आकाराचे मोठे मोठे ड्रॅगन नाचवले जातात. ड्रॅगनचं नृत्य हे नववर्षाच्या स्वागतातील सगळ्यात आकर्षक ठरतं. अनेक ठिकाणी ड्रॅगन नृत्य (Dragon Dance) आणि लायन नृत्याचं (Lion Dance) आयोजन केलं जातं. नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा हा सोहळा नयनरम्य असतो.  यामुळे दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो अशी समजूत आहे. 


तंत्रज्ञानात चीनची मजल
चिन संस्कृती जेवढी जपते तितकेच ते तंत्रज्ञानाच्या (Technology) बाबतीतही अग्रेसर आहेत. याचाच नमुना दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. चीनमध्ये आकाशात एक विशाल ड्रॅगन उडताना पाहिला मिळतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा ड्रॅगन बनवण्यात आला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ टेक बरीटो नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आकाशात उडणारा हा ड्रॅगन तब्बल एक हजार ड्रोनच्या (Drone) मदतीने बनवण्यात आला आहे. रंगीबेरंगी लाईट्सच्या मदतीने हे ड्रोन सजवण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या उडत्या ड्रॅगनचा नजारा डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. 



सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत 4.7 मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. एक लाखाहून अधिक युजर्सने या व्हिडिओला लाईक केलं आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. 


चीनच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध
चीनमधील वेगवेळ्या गावात वेगवेगळे ड्रॅगन नाचवण्याची पद्धत आहे. बेंच ड्रॅगन म्हणजे लाकडाच्या बेंच किंवा बाकापासून तयार केलेला ड्रॅगन, रंगीत कागदापासून तयार केलेला ड्रॅगन, कापडापासून तयार केलेला ड्रॅगन आणि दिव्यांचा ड्रॅगन असे काही ड्रॅगनचे प्रकार असून हे ड्रॅगन नाचवले जातात. शहरांपेक्षा खेडेगांवात ड्रॅगन नृत्य अधिक उत्साहात केलं जातं.