Trending Video : दिवसेंदिवस महिलांवरील हल्लाचे (Attacks on women) प्रमाण वाढतं आहे. भारतातच नाही तर जगभरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. काही घटनाची नोंद झाली पण आजही अनेक प्रकरणही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे समोर आलेली नाहीत. बंद दरवाज्यामागे ती आजही लपवून आहेत. महिलांवर होणाऱ्या या हिंसक कृत्याबद्दल (violent act) आजही अनेक जणी वाचा फोडत नाही आहेत. कधी समाजाची भीती, मुलंबाळ किंवा अजून काही पण या महिला पुढे येत नाही आहे. पण तरुणीवरील हल्लाचा एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


तो तिला मारत होता अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरदिवसा ती रस्त्यावरून जात होती आणि अचानक एक तरुण हातात (assaulting a woman on street) काहीतरी घेऊन तिच्यावर हल्ला करतो. तो तिच्यावर ओरडत होता, त्या वस्तूने तो तिच्यावर सपासप वार करत होता. ती रस्त्यावर खाली कोसळली...पण तो तिला मारत होता...अनेक वेळा अशा घटना घडल्या की लोक बघ्याची भूमिका घेतात. कोणी सहसा वादात पडतं नाही. ती तरुणी मदतीसाठी डोह फोडत होती....(Trending Video Shocking woman girl was beaten up in the road and young man immediately got instant karma punishment Viral on Social media)


अन् हिरोची एण्ट्री होते...


तरुणीला अशी मारहाण सुरु असताना पाहून एक तरुण अचानक धाव येऊन त्या तरुणावर उडी मारतो. चित्रपटातील एखादा सीन वाटावा असं हे दृश्यं...चित्रपटात जशी हिरोची एण्ट्री होते अगदी तशीच जोरदार एण्ट्री हा देवदूत घेतो आणि तिला वाचवितो.  थोड्याच वेळा तिथे इतर लोक जमा होतात आणि त्या दोघांना सोडविण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणतात की आपल्या कर्माची शिक्षा याच जन्मात भोगायची आहे. त्या तरुणीसोबत मारहाण करणाऱ्या तरुणाला लगेचच शिक्षा मिळते. यालाच म्हणतात ना Instant Karma...




व्हिडीओ व्हायरल


हा व्हिडीओ ट्वीटरवर Instant Karma या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजाराहून अधिक वेळा लाइक्स मिळाले आहेत.