किळसवाणी आणि भयानक प्रथा; अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात `हे` लोक
Weird Traditions : जगभरात आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. पण एका जमातीत अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून पिण्याची एक अजब आणि किळसवाणी प्रथा आहे.
Yanomami People Drinks Dead Peoples Ashes : जगभरात वेगवेगळ्या जमाती आणि जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जमात आणि जाती धर्माचे वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहे. जन्म झाल्यानंतरच्या विधीपासून लग्नापर्यंत वेगळी संस्कृती पाहिला मिळते. एवढंच नाही तर अंत्यसंस्कारातही तुम्हाला फरक दिसून येईल. या जगाच्या पाठीवर एक अशी जमात आहे जिथे एक किळसवाणी भयानक प्रथा पाहिला मिळते. त्याबद्दल ऐकून तुम्हाला संताप होईल.
मीडिया रिपोर्टनुसार या जमातीमधील लोक अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून त्याच सेवन करतात. ही अजब आणि किळसवाणी प्रथा दक्षिण अमेरिकेतील यानोमानी जमातीत पाहिला मिळते. एवढ्यावरच हे थांब नाही, यापेक्षा भयानक म्हणजे या जमातीलील लोक आपल्याच कुटुंबातील मृत लोकांचं मांसही ही लोक खातात. (trending Weird Traditions Yanomami People Drinks Dead Peoples Ashes soup)
काय आहे ही नेमकी प्रथा?
या जमातीला जगात यानम किंवा सेनेमा म्हणून ओळखलं जातं. ही जमात दक्षिण अमेरिकेसोबत तुम्हाला व्हेनिजुएला आणि ब्राझीलमध्ये पाहिला मिळते. या जमातीतील अंत्यसंस्काराच्या प्रथेला एंडोकॅनिबेलिज्म असं म्हटलं जातं. एका मीडिया रिपोर्टनुसार या जमातीत कोणाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मृतदेह पानांनी आणि इतर काही वस्तूंनी झाकून ठेवला जातो.
त्यानंतर 30-40 दिवसांनी ते मृतदेह परत आणतात. त्यानंतर मृतदेह जाळलं जातात. नंतर उरलेल्या राखेपासून सूप बनवून ते पितात.
ही अजब प्रथा का पाळली जाते?
अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, यानोमामी जमातीचे लोक ही परंपरा का पाळतात? तर या संदर्भात यानोमामी जमातीचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचे रक्षण केलं पाहिजं. तरच आत्म्याला शांती मिळू शकते, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे मृतदेह त्याच्या नातेवाईक खातात आणि या जमातीचे लोक राखेपासून सूप बनवतात आणि मृतदेह जाळल्यानंतर ते पितात.