रस्त्यावर बियरच्या बाटल्यांचा खच! लोकांनी काय केलं पाहा हा व्हिडीओ....
बियरच्या बाटलने भरलेला ट्रक रस्त्यावरुन जात असताना एका वळणावर ट्रक चालकांचं नियंत्रण सुटतं.
Trending News : सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडीओचा खजिना असतो. या सोशल मीडियावर एकशेएक असे भन्नाट व्हिडीओ तुम्हाला पाहिला मिळतात. काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला भावूक करतात. काहीतर व्हिडीओ तर थरारक आणि भयानक असतात ते पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियाच्या या खजिनातून एक व्हिडीया सध्या व्हायरल होतो आहे.
तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात एखाद्या मालवाहूतक ट्रकला अपघात होतो. या अपघातानंतर ट्रकमधील जे काही सामान असतं ते रस्त्यावर पडतं. हे सामान वेचण्यासाठी स्थानिकांची एकच झुंबड आपल्याला पाहिला मिळते. तुम्हाला आठवतो का, बारामतीमध्ये एका दारूच्या बाटल घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला होता. त्यावेळी रस्त्यावर पडलेल्या दारुच्या बाटल घरी घेऊन जाण्यासाठी तळीरामांनी एकच गर्दी केली होती. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्य व्यक्त कराल.
बियरच्या ट्रकला अपघात आणि....
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बियरच्या बाटलने भरलेला ट्रक रस्त्यावरुन जात असताना एका वळणावर ट्रक चालकांचं नियंत्रण सुटतं. त्यावेळी या ट्रकमध्ये असलेल्या बियरच्या बाटल रस्त्यावर सर्वत्र पसरतात. रस्त्यावर सगळीकडे बियरच्या बाटलच बाटल दिसतात. यातील काही बाटल फूटतात तर काही बाटल चांगल्या असतात. मग या ट्रक चालकावर चांगल्या बाटल जमा करण्याची वेळ येत. अशावेळी तुम्ही काय कराल, त्या बाटल घरी घेऊन जाण्यासाठी धावपळ करणार ना. पण या व्हिडीओत काही तरी वेगळंच चित्र दिसलं. रस्त्यावरील बाटल ट्रक चालक उचलत होता, तेव्हा बघता बघता रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी त्याला मदत करायला सुरुवात केली. काही वेळात रस्त्यावरील सगळ्या बाटल ट्रक चालकाकडे देण्यात आला आणि रस्ता स्वच्छ झाला.
ट्रकचालकाला मदत करणाऱ्या या सगळ्या हिरोला बियर कंपनी शोधत आहेत. हा शानदार व्हिडीओ ट्विटरवरील Rex Chapman नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ साऊथ कोरियाचा आहे असं सांगण्यात आलं आहे. 41 सेकंदच्या व्हिडीओला आतापर्यंत 29 लाख व्यूज मिळाले आहेत. तर हजारो यूजर्सने हा व्हिडीओ लाइक केला आहे. एका यूजरचं म्हणं आहे की, ''आजही जगात चांगली लोक आहेत.''