`ऑफिसर, ऑफिसर....`, छतावर शूटरला पाहताच ट्रम्प समर्थकांनी सुरु केली होती आरडाओरड; पाहा VIDEO
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यात गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. दरम्यान या गोळीबाराआधीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या (US President) निवडणूक शर्यतीत आघाडीवर असणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आला. य़ावेळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. युएस सिक्रेट सर्व्हिसचं (US Secret Service) मोठं अपयश असून, घटनास्थळी नागरिकांनी त्यांना सतर्क केलं असतानाही कारवाई कऱण्यास उशीर झाल्याचं दिसत आहे. हा दावा सिद्ध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. घटनास्थळी उपस्थित अनेक साक्षीदारांनी आपण अधिकाऱ्यांना शूटरला पाहताच सतर्क केलं होतं असं सांगितलं आहे.
20 वर्षांचा हल्लेखोर माजी राष्ट्राध्यक्षांपासून थोड्याच अंतरावर एका उघड्या छतावर पोहोचू शकला हेच यंत्रणांचं अपयश आहे. तिथे पोहोचल्यानंतर इतक्या सहजपणे तो कसा काय गोळीबार करु शकला? इतकंच नाही तर उपस्थित वारंवार अधिकाऱ्यांना छतावर कोणीतरी आहे हे दाखवत असतानाही पाऊल का उचललं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Grant Godwin य़ा सिटिजन जर्नलिस्टने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हल्लेखोर अत्यंत सहजपणे छतावर पोहोचून हल्ल्यासाठी योग्य जागा शोधत असल्याचं दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती 'ऑफिसर, ऑफिसर' असं ओरडत अधिकाऱ्यांना आगामी धोक्याचा इशारा देताना ऐकू येत आहे. तसंच दुसरी व्यक्ती, 'कोणीतरी छतावर आहे' असं सांत हल्लेखोराकडे बोट दाखताना दिसत आहे.
ट्रम्प ज्या स्टेजवर होते तिथून हल्लेखोर 150 मीटरपेक्षा कमी अंतरावर होता. यावेळी तो छतावर चढल्यानंतर धीम्या गतीने पुढे सरकताना दिसत आहे. "कोणीतरी छतावर आहे... तिथेच... तू त्याला पाहिलंस का? तो झोपला आहे... होय, तो खाली झोपला आहे," असं एक व्यक्ती म्हणताना ऐकू येते.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना, Grant Godwin ने लिहिलं आहे की, "हे कसं घडलं? सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला हा धोका टाळण्यासाठी इतका वेळ लागणं मूर्खपणाचं आहे. मी डोळे झाकून हे पाहू शकत नाही. रॅलीतील उपस्थितांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कळवलं असतानाही तुम्ही गोळीबार होण्याआधी त्याला थांबवू शकला नाहीत".
या व्हिडीओवर व्यक्त होताना एका युजरने यापेक्षा फूट लॉकला जास्त चांगली सुरक्षा असते असं म्हटलं. "म्हणजे 20 वर्षीय मुलगा ट्रम्प स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकला. फक्त एकच जागा त्यांना सुरक्षित करायची होती? याला काही अर्थ नाही," असं दुसरा युजर म्हणाला.