वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका  (Presidential Election) होणार आहेत. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  (President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कथित प्रेम प्रकरणानंतर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रम्प यांना एका पॉर्न स्टारला सुमारे 33 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रम्प यांच्यासोबत कथित प्रेम प्रकरणानंतर शांत राहण्यासाठी पैसे देण्यात आले असल्याचं पॉर्न स्टारचं (Porn Star) म्हणणं आहे. अमेरिकेच्या एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष  ट्रम्प यांना 33 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सने (Stormy Daniels) 2006 मध्ये ट्रम्प यांच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. परंतु ट्रम्प यांनी याचं स्पष्टपणे खंडन केलं आहे. 41 वर्षीय स्टॉर्मी डेनियल्सने ट्रम्पवर न्यायालयीन खटला केला होता. नंतर हे प्रकरण रद्द करण्यात आलं. मात्र त्यानंतर कॅलिफोर्नियातील कोर्टाने ट्रम्प यांना डॅनियल्सने खटल्यादरम्यान खर्च केलेले सर्व पैसे ट्रम्प यांना द्वावे लागणार असल्याचं सांगत 33 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. स्टॉर्मी डॅनियल्सने कोर्टाच्या या निर्णयानंतर ट्विटही केलं आहे. 



यापूर्वी ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केल्यानंतर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने एक पुस्तकही लिहिलं होतं, ज्यात ट्रम्प यांच्याशी असलेल्या आपल्या प्रेमसंबंधांबद्दल खुलेपणाने भाष्य केलं होतं. या पुस्तकाची खूप चर्चादेखील झाली होती.