इंडोनेशियामध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
जकार्ता : इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि जावा बेटाजवळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अनेक इमारतींचे नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू ९१ किमी जमिनीच्या खाली सांगण्यात येतेय.
त्सुनामीचा इशारा
६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर सरकारने जावा बेटाजवळी भागांमध्ये त्सुनामीचा इशारा दिलाय.