Queen Elizabeth Video: महाराणीच्या मृत्यूवर त्या टीव्ही अँकरची धक्कादायक कृती, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनतंर जग शोककळेत बुडाले आहे. टिव्ही शोच्या दरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूची बातमी मिळताच तो अँकर प्रंचड खूश होताना दिसतो.
Elizabeth II Death Video: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनतंर जग शोककळेत बुडाले आहे. बऱ्याच देशांतील राष्ट्रपतींपासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत ट्विट करत दु:ख व्यक्त केले. पण काही असे देखील लोक आहेत ज्यांनी ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू शैंपेन पित साजरा केला. अर्जेंटीनामधील एका अँकरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहे. चला पाहुया त्या व्हिडीओ मध्ये नेमकं असे काय केले त्या अँकरने.
TV anchor celebrating the death of Elizabeth II : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनतंर जगात शोककळा पसरली. बऱ्याच देशातील राष्ट्रप्रमुखांनी महाराणीच्या निधनाने जागतिक नुकसान झाले आहे असे दु:ख व्यक्त केले. पण अशातच एक व्यक्ती त्यांचा मृत्यू शैंपेन पित साजरा करताना दिसला. ही सामान्य व्यक्ती नसून एका टिव्ही चेनलचा अँकर आहे ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू झाल्याचा आनंद त्याने जगासमोर साजरा केला. ही सेलिब्रेशनची व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानतंर बऱ्याच लोकांनी त्या व्हिडीओवर कडक शब्दात निंदा आणि राग व्यक्त केला.
त्या व्हिडीओत सहकर्मचाऱ्यांचा देखील समावेश
रिपोर्टच्या अनुसार, त्या अँकरचे नाव सैंटियागो कुनेओ. टिव्ही शोच्या दरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूची बातमी मिळताच तो अँकर प्रंचड खूश होताना दिसतो. अपमानाच्या स्वरात तो म्हणतो, योग्य व्यक्तीचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर या व्हिडीओच्या शेवटी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूची मस्करी करताना व त्या अँकरच्या विधानांवर टाळ्या वाजवताना त्याचे सहकर्मचारी देखील दिसले. त्या व्हिडीओमध्ये अँकर सैंटियागो कुनेओ म्हणतो, कित्येक वर्षांपासून मी एलिझाबेथच्या मृत्यूची वाट पाहत होतो. या सगळ्या गप्पा गोष्टी टिव्हीवर झाल्यानतंर त्या अँकरने शैंपेनची बॉटल उघडून महाराणीचे मरण कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावरील यूजर्सकडून त्या अँकरची क्लास
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर बऱ्याच यूजर्सने नापसंती दर्शवली. तर त्यातल्या काही यूजर्सने तर त्या अँकरची क्लास देखील घेतला. एक यूजर म्हणाला की अँकरला रॉयल परिवारांचा तिरस्कार आहे पण याचा अर्थ असा नाही की मृत व्यक्तीचा अपमान करणे. दुसरा यूजर म्हणाला, साहजिकच त्या अँकरने हे सगळं TRP वाढावी याखातर खटाटोप केलेला दिसत आहे. तो अँकर थोडा जरी हुशार असेल तर तो कधीच मृत व्यक्तीचा अपमान जगासमोर करणार नाही.