मुंबई : लग्न हा विषय मुलींसाठी जवळचा विषय आहे. मुली आपल्या लग्नासाठी खूप आतुरतेने वाट पाहातात. मग त्या भारताती मुली असो किंवा भारता बाहेरील. परंतु लग्नाशी संबंधीत एक विचित्र प्रकार मलेशियातून समोर आला आहे. ज्यामध्ये दोन मैत्रीणींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु, त्यांनी मुलांना जी अट ठेवली आहे ती धक्कादायक आहे. ज्यामुळे या मैत्रीणी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांनी त्यांची अट सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियामध्ये राहणाऱ्या दोन मैत्रिणींना एकाच माणसाशी लग्न करायचे आहे. या दोन मैत्रिणींनी फेसबुकवर अशी पोस्ट केली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.


फेसबुकवरील सेन्सी मलेशिया नावाच्या पेजवर या दोन मैत्रिणींनी सांगितले की, दोघांनाही एकमेकींची सवत बनायचे आहे आणि एकाच व्यक्तीशी लग्न करायचे आहे.


या फेसबुक पेजच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, दोन्ही मैत्रिणी अशा मुलाच्या शोधात आहेत, जो त्या दोघांशी लग्न करू शकेल. याशिवाय दोन्ही मैत्रिणीनी पेजवर आपली निवड शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की त्या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत आणि त्यांना एकमेकांची सवत बनण्यास कोणतीही अडचण नाही.


दोन्ही मैत्रिणींनी फेसबुक पोस्टवर स्वतःबद्दलची माहितीही शेअर केली आहे.


फेसबुक पेजनुसार, एकीचे वय 31 वर्षे आहे. तर, दुसरीचे वय 27 वर्षे आहे. त्यात 31 वर्षीय मैत्रिण ही एका मुलाची आई आहे. तर 27 वर्षीय तरुणी स्वतःचा लाँड्री व्यवसाय चालवते. फेसबुक पोस्टमध्ये दोघींनाही असा नवरा हवा आहे, जो दोघांनाही त्या जशा आहेत, तसेच स्वीकार करतील. त्यांनी लिहिले की, जर एखादी व्यक्ती दोन बायका स्वीकारू शकते, तर ते नातं त्यांना मान्य आहे.


याशिवाय त्या फेसबुकवर नशीब आजमावत असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांचे नशीब चांगले असेल, तर असा माणूस त्यांना नक्की मिळेल. ही पोस्ट फेसबुकवर शेअर होताच व्हायरल झाली. पोस्टवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. अनेकजण ही माहिती मित्रांना शेअर करुन मजाही घेत आहेत.