Two Sun Seen In The Sky: मस्त वातावरण असल्याने तुम्ही पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडता. निवांत फेरफटका मारत असतानाच अचानक आकाशात एकाऐवजी 2 सूर्य तुम्हाला दिसतात आणि तुम्ही चक्रावून जाता. खरं तर आकाशात 2 सूर्य दिसल्यास आपण स्वप्नात तर नाही ना? आपल्याला भास तर होत नाही ना? असा विचार एकदा ना एकदा तुमच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून बरेच लोक हैरान झाले असून हे कसं शक्य आहे असा प्रश्न त्यांना पडला आहे. 


2 सूर्य दिसतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओवर लिहिण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये आकाशात 2 सूर्य दिसत आहेत असं लिहिलेलं आहे. एका बाजूला एक सूर्य आणि लगेच दुसऱ्या बाजूला दुसरा सूर्य असं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण नेमका हा प्रकार आहे तरी काय आणि असे 2 सूर्य कसे काय एकाच वेळेस दिसले? 


पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आणि आपल्या सूर्यमालेतील एकमेव तासा म्हणजे सूर्य. आगीच्या गोळ्याप्रमाणे दिसणारा सूर्य पृथ्वीवरुन फारच प्रथर आणि मोठा दिसतो. पृथ्वीवरुन एकच सूर्य दिसतो. अगदी कोणत्याही प्रांतात, खंडात किंवा कुठेही गेलं तरी पृथ्वीवरुन सूर्य एकच दिसणार. मात्र हाच दावा खोटा आहे की काय अशी दृष्यं व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत. सर्व वैज्ञानिक शक्यता पडताळून पाहिल्या तर आकाशात काहीही झालं तरी एकच सूर्य दिसला पाहिजे. पण व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे 2 सूर्यांमागील नेमकं कारण काय? मागील अनेक दिवसांपासून हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 


व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?


व्हायरल झालेला हा व्हिडीओ समुद्रातील एका जहाजावरुन शूट करण्यात आला आहे. एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हे दुष्य कैद केलं आहे. व्हिडीओच्या डाव्या बाजूला दिसणारा सूर्य चमकताना दिसत आहे. तर याच ठिकाणावरुन कॅमेरा पॅन करुन उजवीकडे गेल्यानंतर उजवीकडे दिसणारा सूर्य हा ढगांमध्ये लपलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण गोंधळले आहेत. मात्र या व्हिडीओमागील सत्य आता समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर ब्लू बूक रेप्टिलीयन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला 'या 2 सूर्यांच्या व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटतं?' असा प्रश्न विचारला आहे. आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहा मग त्यामागील सत्य जाणून घेऊयात...



सत्य काय?


आता या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा आकाशातील एक गोळा हा सूर्य नसून चंद्र आहे. अनेकदा आपल्याला एकाच वेळेस चंद्र आणि सूर्य आकाशात पाहायला मिळतात. असाच हा क्षण होता. फक्त समुद्रातील जहाजामधून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याने क्षितीजाजवळ 2 बाजूला 2 सूर्य असल्याचा भास होत होता. यापूर्वी 2016 साली अमेरिका आणि कॅनडामध्येही अशाचप्रकारे एकाच वेळेस 2 सूर्य दिसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यावेळीही सत्य समोर आलं तेव्हा त्यापैकी एक चंद्र असल्याचं स्पष्ट झालं.