LGBTQ विरोधात `या` देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड
दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.
Uganda LGBTQ Rules : समलैंगिक संबंधांबाबत (Homosexual Relationship) जगातील अनेक देशांमध्ये वाद सुरु आहे. काही देशात समलैंगिकता म्हणजे पाप आणि समाजाविरुद्ध असल्याने त्याला मान्यता नाहीए. तर काही देशात समलैंगिक संबंधांना मान्यता असून अनेक कपल्स आनंदाने राहात आहेत. समलैंगिक व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना 'गे' (Gay) म्हटलं जातं. स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना 'लेस्बियन' (Lesbian) म्हटलं जातं. पण दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) एका देशाने आता थेट समलैंगिक संबंधांविरोधात विधेयकचं (Bill) मंजूर केलं आहे. या विधेयकानुसार ती व्यक्ती समलैंगिक असल्यास आढळल्यास त्याला गुन्हेगार मानलं जाणार आहे. (Passes Bill Criminalizing Identifying as LGBTQ)
समलैंगिक संबंधांविरोधात विधेयक मंजूर
दक्षिण आफ्रिकेतील युंगाडा (Uganda) देशाच्या संसदेत विधेयक मंजूर करण्यात आलं असून या विधेयकानुसार समलैंगिक संबंध गुन्हा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या विधेयकानुसार समलैंगिक संबंध करताना व्यक्ती आढळल्यास त्याला थेट मृत्यूदंडाची (Death Penalty) शिक्षा होऊ शकते. आफ्रिकेतील 30 हून अधिक देशांमध्ये समलैंगिक संबंधांना विरोध असून त्याविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे. हे विधेयक आता मंजूरीसाठी युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांच्याकडे पाठवण्यात आलं आहे.
कठोर शिक्षेची तरतूद
युगांडा संसदेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार देशात समलैंगिक गुन्हा असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. या विधेयकाचं उल्लंघन करणाऱ्यांना जन्मठेप (Life Imprisonment) किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. या विधेयकानुसार 18 वर्षाखालील स्त्री किंवा पुरुषाशी समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा सुनावली जाईल. तर समलैंगिक संबंध करताना आढळणाऱ्या व्यक्तीला किंवा समलैंगिक विवाह करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
2013 मध्येही केला होता कायदा
याआधी 2013 मध्येही युगांजात समलैंगिक संबंधांविरोधात कायदा बनवण्यात आला होता. पण पश्चिमी देशांचा कडाडून विरोध आणि दबावानंतर हा कायदा लागू करण्यात आला नव्हता. युगांडाचे राष्ट्रपती मुसेवेनी हे देखील समलैंगिक संबंधांविरोधात आहेत.