महिलेच्या हातात ठेवले हॉस्पिटलने 52 लाख रुपयांचे बील, कारण ऐकून हैराण व्हाल
पूर्वीच्या काळात किंवा आजही खेड्यात बर्याच महिलांची प्रसूती ही घरी केली जाते. बर्याचदा ग्रामीण भागातील सुईणी त्यांच्या अनुभवाच्या आधारे प्रसूती करत असतात.
न्यूयॉर्क : पूर्वीच्या काळात किंवा आजही खेड्यात बर्याच महिलांची प्रसूती ही घरी केली जाते. बर्याचदा ग्रामीण भागातील सुईणी त्यांच्या अनुभवाच्या आधारे प्रसूती करत असतात. ज्यामुळे अपुऱ्या वैद्यकीय उपचारामुळे बर्याच महिलांचा मृत्यू होतो. परंतु शहरे आणि विकसित देशांमध्ये अशी स्थिती नाही.
शहरात लोकं रुग्णालयात प्रसूती करतात. तेथे महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा असतात. ज्यासाठी बर्याच वेळा लोकांना खूप पैसेही मोजावे लागतात. यासंदर्भातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
अमेरिकेत आई होणे खूप महाग
खरंतर, एका महिलेने आपल्या प्रसूतीचे रुग्णालयाचे बिल सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. असे सांगितले जात आहे की, यूके (युनायटेड किंगडम) च्या लीड्स येथे राहणाऱ्या 39 वर्षीय लिसा डोलानने टिकटॅाकवर (TikTok) व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, अमेरिकेत आई होणे किती महाग आहे.
लिसाने अमेरिकन रुग्णालयात तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. पण जेव्हा लिसाला 70 हजार डॉलर्स म्हणजेच 52 लाख रुपयांचे बिल दिले तेव्हा तिला धक्का बसला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे बिल कोणत्याही खाजगी खोलीचे नसून ते जनरल खोलीचे आहे.
ही रक्कम पाहून सोशल मीडियावरील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. भारतातील बर्याच लोकांनी असे लिहिले की, भारतात अशा पैशाने बर्याच गंभीर आजारांवर उपचार केले जातात. व्हिडीओमध्ये लिसाने तिचे मेडिकल बिल दाखवल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. अमेरिकेत तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर लिसाला रुग्णालयात 52 लाख रुपयांचे बिल दिले गेले.
महत्त्वाचे म्हणजे यूके मधील वैद्यकीय सुविधा खूपच महाग आहे. अमेरिकेत जर तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल तर तुमच्या खिश्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.