मुंबई :  रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरू आहे. त्याचवेळी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांनी या परिसराचा जवळ-जवळ ताबा घेतला आहे. तसेच दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा 3 वेळा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील होत आहे. ज्यामुळे ते पोलंडला पळून गेले आहे अशा बातम्या येत आहेत. यातच आता आणखी एका धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. असे म्हटले जात आहे की, रशियन सैनिकांकडून युक्रेनमधील महिलांवर बलात्कार केला जात आहे. परंतु याबाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियन सैन्याकडून युक्रेनच्या महिलांचा बलात्कारा होत असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांच्याकडे कोणताबी पुरावा नाही.


रशियाला उत्तर द्यावे लागेल


कुळेबा म्हणाले की, आपल्याकडे फक्त सभ्यता आहे. त्यामुळे रशियाच्या सैनिकांच्या अशा कृतीसाठी त्यांना जबाबदार धरले जाईल.


राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न


त्याचवेळी, एका अहवालानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची गेल्या एका आठवड्यात तीन वेळा हत्येचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'द टाइम्स'ने हा दावा केला आहे. मात्र, रशियाचा हा हल्ला त्यांच्या विरोधात असलेल्या रशियामधील एका एजन्सिने हाणून पाडला आहे.


त्याच वेळी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील असा दावाही केला होता की, त्यांना मारण्यासाठी रशियाकडून 400 मारेकरी पाठवण्यात आले होते. या कामाच्या बदल्यात रशियाने मारेकऱ्यांना मोठे बक्षीस देऊ केले होते.