Ukraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?
आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशिया- युक्रेन आमने-सामने
मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 12 वा दिवस. रशियानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आजच्या दिवसाला या देशाची झालेली हानी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यानच युक्रेननं International Court of Justice (ICJ) मध्ये आपल्या न्यायासाठी धाव घेतली. (Ukraine Russia War)
रशियाविरोधात कारवाई करण्याची मागणी युक्रेननं केली. त्यातच आज युक्रेनकडून संयुक्त राष्ट्रातील या सर्वोच्च न्यायालयातून आपातकालीन निर्णय घेण्याची मागणी करणार आहे. जिथं रशियाकडून ताबडतोब युद्धबंदीची घोषणा व्हावी याचाही उल्लेख असणार आहे.
दोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामध्ये रशिया सर्वसामान्य नागरिकांवर निशाणा साधत असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे.
युक्रेनचा हा आरोप पाहता जागतिक न्यायालयाकडून रशियावर युद्धबंदीच्य़ा घोषणेचा निर्णय़ लादला जाऊ शकतो. पण, रशियानं मात्र या आरोपाला फेटाळून लावलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सांगण्यानुसार युक्रेनमध्ये रशियाच्या विशैष सैन्य कारवाईची गरज होती जेणेकरून पूर्व युरोपमध्ये असणाऱ्या रशियन नागरिकांना संरक्षण देता येईल.
प्राथमिक भाशा रशिय असणाऱ्या नागरिकांसाठीच रशियानं ही भूमिका घेतल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे.
रशियाच्या या आरोपावर युक्रेननं हा नरसंहाराचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. नरसंहाराचं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या रुपात अधिकृतपणे जगासमोर येतं.
तेव्हा आता नेमकं या युद्धावर कोणता निर्णय दिला जाणार यावरच साऱ्या जगाच्या नजरा खिळलेल्या असतील.