Ukraine Russia War : रशियाच्या हल्ल्यात 2 मुलांसह 21 नागरिकांचा मृत्यू
Ukraine-Russia War Latest Update: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा दावा करत आहे.
मास्को : Ukraine-Russia War Latest Update: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा दावा करत आहे. मात्र, युक्रेनमधील सुमी शहरावर जोरदार हल्ले रशियाने चढविले आहे. वस्तीच्या भागात हे हल्ले झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. रशियाच्या हल्ल्यात 2 मुलांसह 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी सध्याची माहिती आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे जागतिक युद्धात रूपांतर होण्याची भीती अनेक देशांना आहे. युद्धामुळे अनेक देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत आपल्या नागरिकांच्या परतीसाठी ऑपरेशन गंगा चालवत आहे. रशियन सैन्याने 8 मार्चच्या पहाटे सुमीमधील निवासी भागावर बॉम्बफेक केली. युक्रेन येथील कीवमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, त्यांनी मायकोलायव बंदरात अडकलेल्या 75 भारतीय खलाशांना वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला. 2 लेबनीज आणि 3 सीरियनसह 57 खलाशांना बाहेर काढण्यात आले. अडकलेल्या आणखी 23 खलाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनमधील सुमी येथे रशियन हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रशियन सैन्य युक्रेनची लूट करत असून आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने सांगितले की खार्किव, सुमी, चेर्निहाइव्ह आणि कीवमध्ये दरोडे पडल्याचे वृत्त आहे, असे युक्रेनकडून सांगण्यात येत आहे.