God Of Marriage : जपानच्या होक्काइडो प्रांतात राहणारा 36 वर्षीय रयुता वतनाबेने एक अतिशय विचित्र स्वप्न पाहिलं. त्याच्या चार पत्नी, दोन दोन प्रेमिका असतील. एवढंच नव्हे तर त्याचं ध्येय हे 54 मुलांचा बाप होण्याचं आहे. रयुता वतनाबेचं असं म्हणणं आहे की, अशा पद्धतीने त्याला 'God Of Marriage'  हा किताब पटकवायचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वतनाबे गेल्या 10 वर्षांपासून काम करत नाही. एवढंच नव्हे तर तो आपल्या चार पत्नी आणि प्रियसिच्या कमाईवर अवलंबून आहे. आतापर्यंत त्याची 10 मुले आहेत. तो आपल्या दोन मुलांसोबत आणि तीन पत्नींसोबत राहत आहेत. रयुता स्वतः घरातील काम सांभाळतो. ज्यामध्ये घरची सर्व कामे, जेवण बनवणे आणि मुलांची काळजी घेणे यासारख्या कामांचा समावेश आहे. 


जपानची अनोखी कहाणी 


रयुताचा महिन्याचा घर खर्च हा जवळपास 6000 डॉलर आहे. त्याचा हा खर्च त्याच्या पत्नी आणि प्रियसी मिळून सांभाळतात. वतनाबेची चौथी पत्नी 24 वर्षीय आहे. रयुताने आपल्या दोन्ही प्रियसींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधून काढले आहे. जपान टीव्ही शो 'अबेमा प्राइम' वर वतनाबे यांनी सांगितलं की, मला फक्त महिलांशी प्रेम आहे. जोपर्यंत आपण एकमेकांना समान स्वरुपात प्रेम करतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठिक आहेत. 


मुलांच्या बाबतीत तोडायचा रेकॉर्ड 


जपानमधील सर्वाधिक मुलांचा बाप होण्याचा विक्रम मोडीत काढणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे वतनाबे सांगतात. इतिहासानुसार, टोकुगावा आयनारी नावाच्या शोगुनने त्याच्या राजवटीत 27 राण्या आणि 53 मुले जन्माला घातली. वतनाबे म्हणतात, "माझ्या नावाची इतिहासात नोंद व्हावी म्हणून मला 54 मुलांना जन्म द्यायचा आहे. मी अजूनही नवीन बायका शोधत आहे."


वतनाबे यांची खास जीवनशैली सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. काही लोक त्याच्या निवडीचा आदर करतात, तर काहींनी तो टीकेचा विषय बनवला आहे. एका YouTube युझरने टिप्पणी केली, "त्याची मुले कधीही त्यांच्या वडिलांच्या जवळ जाऊ शकणार नाहीत कारण तेथे खूप मुले आहेत." तर दुसरा म्हणाला, "मी माझ्या मुलांना असे कधीही जगू देणार नाही." दुसऱ्या युझरने सांगितले की, "ते सुखी कुटुंबासारखे वाटतात. त्यांच्या निवडीचा आदर करा.