नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्रात अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषद सत्राला संबोधित करतील. या सत्रामध्ये त्यांच्यासोबत नॉर्वेचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्र संघटना यावर्षी त्यांच्या ७५ व्या वर्ष साजरं करणार होते. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नेत्यांना आवाहन केले आहे की, सर्व जण आपले रेकॉर्ड केलेले संदेश यूएनला पाठवू शकतात.


या वार्षिक उच्च स्तरीय सत्रामध्ये सरकारी, खाजगी क्षेत्र, नागरी संस्था आणि शैक्षणिक यासह विविध गटातील उच्च स्तरीय प्रतिनिधींचा समावेश असेल. यंदाचं  हे ७५वं वर्ष असल्यामुळे संयुक्त राष्ट्र अधिक बळकट कसं होवू शकतं यावर चर्चा करण्यात येणार आहे. 


या उच्च स्तरीय सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी, कोरोना व्हायरसचं थैमान इत्यादी महत्त्वाच्या घटनांना बळकटी देण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असेल.