मुंबई : अमेरिकेचे ड्रग्स एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने लाहोरमधील व्यापारी मुहम्मद आसिफ हाफिज यांच्याकडे फरार दाऊद इब्राहिमच्या ठिकाणाबद्दल चौकशी केली. दाऊदला संयुक्त राष्ट्रांने याआधीच अतिरेकी घोषित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाफिजच्या वकिलांनी यूके उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात दावा केला आहे की, डीईए आणि सीआयए एजंटने हाफिज यांची दुबईमध्ये 2014 ते 2017 दरम्यान भेट घेतली होती. या दरम्यान त्यांनी दाऊद इब्राहिम 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, तोरा बोरा, तालिबान आणि दाऊदच्या तत्कालीन ठिकाणाची चौकशी केली.


द न्यूज इंटरनेशनलच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एजंट्सनी पाकिस्तानी सोन्याचे व्यापारी असलेले हाफिज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला शोधण्यासाठी मदत मागितली. प्रश्नांच्या उत्तरात हाफिज म्हणाले की, त्यांना तालिबान आणि अफगाणिस्तानाविषयी काहीच माहिती नाही. मात्र, त्यांनी दाऊदशी ओळख असल्याची कबुली दिली.


ते म्हणाला की, एकेकाळी ते आणि दाऊद दोघे दुबईत सोन्याचा व्यवसाय करायचे आणि एकत्र क्रिकेट सामने बघायचो. पण दाऊदने दुबई सोडल्यापासून नंतरचा काहीच संपर्क नाही. कोर्टाच्या कागदपत्रानुसार, हाफिजने अमेरिकन एजंटांना सांगितले की, दुबईमध्ये मुक्काम असताना दाऊद बॉलिवूडच्या कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसायचा. कोणत्याही परफॉर्मन्स आधी आयोजक त्याला विचारायचे, परवानगी आहे का?