नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील संघर्ष किंवा इतर कोणताही संघर्ष झाला तर अमेरिकन सैन्य "ठामपणे उभे राहील" असे व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. मुंबईत दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर अधिकाऱ्याचे हे विधान आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना फॉक्स न्यूजला सांगितले की, संदेश स्पष्ट आहे. आम्हाला उभे राहून चीन किंवा इतर कोणत्याही शक्तिशाली किंवा प्रभावी ताकदीच्या हातात कमान नाही देऊ शकत. मग तो तिकडच्या क्षेत्रात असो किंवा इकडच्या.'


पूर्व लडाखच्या अनेक भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये आठ आठवड्यांपासून तणाव कायम आहे. सोमवारी चिनी सैन्य काही प्रमाणात मागे सरकल्याची माहिती देखील पुढे आली आहे.


राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रविवारी फोनवर चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून (एलएसी) सैन्याची माघार मान्य केली. मीडोज यांनी म्हटलं की, 'अमेरिकेने दोन विमानवाहक जहाज दक्षिण चीन समुद्रात पाठवले आहेत.'


ते म्हणाले की, आमच्याकडे जगातील सर्वोत्तम शक्ती आहे हे जगाला ठाऊक असेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्रात प्रादेशिक वादांमध्ये चीनचा सहभाग आहे. चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा करतो. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांचाही या भागावर दावा आहे.