वॉशिंग्टन : कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे. त्यामुळे या देशांत पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासावरही निर्बंध घातलण्यात आले आहेत. दरम्यान, हे निर्बंध एक महिन्यानी वाढवले आहेत. दरम्यान, भारतात पाच राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन लावण्याचे संकेत मिळत आहेत. (US, Canada, Mexico extend non-essential travel restrictions till March 21)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा धोका वाढल्याने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये 21 मार्चपर्यंत कोरोनाविषयक निर्बंध वाढवले आहेत. नव्या नियमानुसार कामाशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही. प्रवासाचे कारण सांगावे लागणार आहे. हे निर्बंध आज 21 फेब्रुवारीपर्यंतच होते. परंतु आता महिनाभराने यात वाढ करण्यात आली आहे.


 जगभरात आतापर्यंत 11 कोटी 12 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 24 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर आठ कोटींहून अधिक नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कोरोना लसीकरण कार्यक्रमात सुरु झाल्यानंतरही कोरोनाचा धोका कायम आहे. कॅनडात कोरोना संसर्गाची लाट तीव्र झाली आहे. पंतप्रधान जस्टिन यांनी नागरिकांना कोविड-१९च्या नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.


 अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोने विनाकारण प्रवास निर्बंध 21 मार्चपर्यंत वाढवले आहेत. नव्या नियमानुसार कामाशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथीचा रोग नियंत्रणात राहण्यासाठी युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि कॅनडा यांनी 21 मार्चपर्यंत अनावश्यक प्रवास प्रतिबंध वाढविला.


'आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि कोविड -19चे पुढील संकट रोखण्यासाठी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता विनापरवानगी प्रवास करता येणार नाही, असे निर्बंध वाढवताना डीएचएसने शुक्रवारी सांगितले.


कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा धोकादायक ठरु शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचा तिसरा टप्पा हा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. कॅनडाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येत असल्याने चिंत व्यक्त करण्यात आली आहे.