वॉशिंग्टन: जगातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झालेल्या अमेरिकेतील मृतांचा आकडा आता २० हजारांच्या पुढे गेला आहे. मृतांच्या संख्येच्याबाबतील आता अमेरिकेने इटलीलाही मागे टाकले आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात ६,३६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आगामी काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले नाही तर उन्हाळा संपेपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल दोन लाख नागरिक मृत्यूमुखी पडतील, अशी भीती काही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. यानंतर हा व्हायरस जगातील १९३ देशांमध्ये पसरला होता. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगभरात तब्बल १७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अमेरिकन रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ इटली, स्पेन, फ्रान्स आणि इंग्लंडमधील परिस्थितीही अतिश्य गंभीर आहे. तर कोरोनाच्या उत्त्पत्तीचे मूळ केंद्र असलेल्या चीनमध्येही पुन्हा कोरोनाचे ९९ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी चीनमध्ये कोरोनामुळे ३,३३९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर कोरोनाची साथ आटोक्यात आणल्याचा दावा चीनने केला होता. मात्र, आता पुन्हा येथील रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. 


कोरोना व्हायरस : सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत

तर भारतामध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ हजाराच्या पल्याड पोहोचला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याचेही म्हटले जात आहे. भारतामध्ये आतापर्यंत २७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.