US Election 2024 Voting Result: अमेरिका राष्ट्राध्यक्षांसाठी आज 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून कमला हॅरिस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पूर्वीच्या काळी एका दिवसांतच नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड होत होती. मात्र, 2024मध्ये आता परिस्थिती बदलली आहे. तज्ज्ञांच्या मते, यावर्षी मात्र अमेरिकेला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत निवडणुकीत मतमोजणी अनेक टप्प्यांत होत होती. प्रत्येक राज्याची एक वेगळी पद्धत असते. राज्यात काही तासांतच मतमोजणी पूर्ण होते. पण निकाल येण्यासाठी अनेक दिवस लागतात. खासकरुन अमेरिकेत विजेत्याची घोषणा रात्रीच केली जाते. मात्र राष्ट्रध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यांसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात. 


अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी निवडकर्त्यांची (इलेक्टर्स) निवड करतात आणि त्यासाठी इलेक्टोरल कॉलेज बनवलं जातं. इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. अमेरिकेतल्या राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही इलेक्टोरल कॉलेज व्होट्स देण्यात आलेली आहेत. अमेरिकेत अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स आहेत. तर, उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतं मिळवावी लागतात. त्यानंतर राष्ट्रध्यक्षांची निवड होते. यंदा अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकांचा निर्णय 7 राज्यांवर अवलंबून आहे. एरिजोना, नेवादा, विस्कॉन्सिन, पेन्सिल्वेनिया, उत्तरी कॅरोलीना आणि जॉर्जिया 270चा आकडा पार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकता. 


मतदानानंतर मतगणनेची प्रक्रिया


मतदानानंतर सर्व बॅलेट्स सुरक्षितरित्या स्थानिक निवडणुका कार्यालयात पोहोचवले जातात. सगळ्यात पहिले मतमोजली काउंटी जिल्हास्तरीय केली जाते. 


हँड मार्क्ड आणि BMD असलेले बॅलेट्स ऑप्टिकल स्कॅनरने निवडले जातात. सर्व प्रकारच्या मतमोजणीचा डेटा कॉम्पुटरवर एकत्र केले जातात. 


मतमोजणीचे निकाल राज्यस्तरांवर पाठवले जातात. त्यांचे ऑडिट होते. तिथे जर काही गडबड झाली तर पुन्हा मतगणना केली जाते. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणुक अधिकारी एक प्रमाणपत्र आणि एसर्टेनममेंट जारी करतात. ज्यात अधिकाधीक मतांची संख्या दिली जाते.


प्रत्येक राज्यात राज्यपाल आणि राज्य सचिव शेवटी मतगणना प्रमाणित करतात. यासाठी डेडलाइन असते. नोव्हेंबरमध्ये निवडलेले इलेक्टर्स डिसेंबरच्या पहिल्या बुधवारनंतर येणार्या मंगळवारपर्यंत त्या-त्या राज्यांना मिळतात. इथे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची निवड करण्यात येते. नंतर स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र राजधानी वॉशिंगटन डीसी येथे पाठवली जाते. 


डिसेंबरच्या चौथ्या बुधवारी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी अमेरिका सीनेटचे अध्यक्ष प्रेसिडेंट इलेक्टर्सचे मत सामील होतात. यानंतर हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह आणि सीनेट मतांची मोजणी केली जाते. या वेळी ही मतमोजणी 6 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. 


नवीन राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार?


20 जानेवारी दुपारी नवीन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. राजधानी वॉशिंग्टन DC च्या US कॅपिटल बिल्डिंगमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. 20 जानेवारी रोजी रविवार असेल तर कार्यकाळ 21 जानेवारीपासून सुरू होईल. अमेरिकेत आधीपासून ही परंपरा नव्हती. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर मार्चपर्यंत कार्यकाळ सुरू होण्यासाठी खूप वेळ जातो. 1933मध्ये राष्ट्रपती फ्रँकलीन डी रुजवेल्ट यांच्या शपथविधीआधी संविधान संशोधनच्या माध्यमातून 20 जानेवारी रोजी नवीन कार्यकाळाची सुरुवातीच्या तारखेची घोषणा करण्यात आली.