वॉशिंग्टन : लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.  दरम्यान, लडाख हिंसक झडपेनंतर भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दोन्ही देशांकडे लागले आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने झालेल्या भारतीय जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, संयुक्त राष्ट्र संघानेही चिंता व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन यांच्यातील तणाव कमी न होता अधिक वाढत गेला आहे. कालच्या घटनेनंतर चीनकडून पुन्हा रात्री घुसखोरी करण्याता आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली. त्यावेळी एक नवीन घटना समोर आली आहे.  यावेळी काही सैनिक नदी तसेच दरीत कोसळून शहीद झालेत. चीनी सैन्य पूर्ण तयारीत आले होते. त्यांच्यासोबत लोखंडाचे रॉड आणि काही तोडलेल्या काटेरी तारा होत्या, अशी माहिती मिळत आहे.


 एएनआयच्या मते, चीनकडून ४३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत मृतांची संख्या आणि गंभीर जखमींचा समावेश आहे. एएनआयनेही उच्च-सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून होणाऱ्या जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. गलवान येथील खोऱ्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीन यांच्यात रात्री झडप झाली. झडपेनंतर चीनच्या हेलीकॉप्टरनी नियंत्रण रेषा पार केली. सूत्रांनी हवामान सांगितले की या घटनेनंतर चीनी हेलीकॉप्‍टरची संख्या दिसून आली. एवढे मोठी संख्या दिसून आल्याने चीन सैनिक मारले गेलेल्या जवानांना नेण्यासाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. 


तर अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच, सोमवारी रात्री गलवाने खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. त्यानंतर संघर्ष अधिकच चिघळला आहे.