जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी भोगावी लागली 30 वर्षे शिक्षा; बाहेर पडताच मृत्यूनं गाठलं
न्यायालयाने शिक्षा संपत असतानाच त्याची निर्दोष सुटका केली होती
घरात साधं काही वेळा आपली चूक नसतानाही आपल्याला बोलणी ऐकावी लागल्याने नक्कीच वाईट वाटलं असेल. पण जर एखाद्या माणसाला कोणताही गुन्हा न करता तीस वर्षे तुरुंगात (Jail) घालवावी लागली असतील तर काय होईल? असाच काहीसा प्रकार अमेरिकेत (america) समोर आलाय. या व्यक्तीला कोणताही गुन्हा (Crime) न करता त्याच्या आयुष्याची तब्बल 30 वर्षे तुरुंगात (Jail) घालववाी लागली आहेत. मात्र या ही पेक्षा वाईट म्हणजे ती व्यक्ती बाहेर आल्यानंतर तिचा मृत्यू (Death) झाला. (US Innocent man imprisoned for thirty years by mistake died as soon as he was released)
तीस वर्षांच्या शिक्षेनंतर तुरुंगातून बाहेर आले
अमेरिकेतील टेनेसी शहरातून हे प्रकरण समोर आलंय. त्यानंतर वाऱ्यासारखी ही गोष्ट सर्वत्र पसरली आहे. लोकांनीही या व्यक्तीच्या प्रति दुखः व्यक्त केलय. मिररच्या वृत्तानुसार, क्लॉड फ्रान्सिस गॅरेट असे या व्यक्तीचे नाव असून वयाच्या 65व्या वर्षी निधन झाले. क्लॉड हे टेनेसी येथील रहिवासी होते. तीस वर्षांची शिक्षा भोगून काही महिन्यांपूर्वी ते तुरुंगातून बाहेर आला होते. मात्र बाहेर आल्यानंतर आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तीस वर्षांपूर्वी क्लॉड फ्रान्सिस गॅरेट त्यांच्या मैत्रिणीसोबत ज्या घरात होते तिथे आग लागली होती. या दुर्घटनेत क्लॉड यांच्या प्रेयसीचा मृत्यू झाला होता. यामुळे क्लॉड यांच्यावर जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आग लावली त्यावेळी आपण झोपलो होतो, असे क्लॉड वारंवार सांगत राहिले. पण त्यांना प्रेयसीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयाने गुन्हा केला रद्द
संपूर्ण शिक्षा भोगल्या नंतर काही वेळ शिल्लक असताना क्लॉड यांच्या कुटुंबीयांनी काही पुराव्याच्या आधारे न्यायालयाच्या निर्णयला आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने संपूर्ण निर्णय रद्द करून क्लॉड निर्दोष असल्याचे सांगत त्यांची सुटका केली. पण तुरुंगातून बाहेर येताच काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला.