वॉशिंग्टन : कोरोनाबाधित अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली आहे. त्यांना सैनिकी रुग्णालयातून व्हाइट हाऊसमध्ये शिफ्ट केलं गेलं आहे. याबाबतची माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आता ट्रम्प यांच्यावर आता व्हाइट हाऊसमध्ये उपचार होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प यांची तब्बेत पहिल्यापेक्षा अधिक चांगली आहे. मात्र ते पूर्णपणे स्वस्थ नाहीत. यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील. ट्रम्प यांना संध्याकाळी ६ च्या सुमारास डिस्चार्ज मिळाला. आता ट्रम्प यांनी ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. त्यांना रेमडेसिवीरचा पाचवा डोस व्हाइट हाऊसमध्ये दिला जाईल. 



शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 


आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगत लवकरच करोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. मला बरं वाटावं म्हणून वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झालोय.