वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) नवी सरकारद्वारे प्रवास सल्ला म्हणजे ट्रॅवल सल्ला (Travel Advisory) जाहीर केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये भारताचा उल्लेख केला आहे. जो बायडन प्रशासनाने आपल्या नागरिकांना सांगितलं आहे की, 'आताच्या परिस्थितीत नागरिकांना भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश'(India, Pakistan, Bangladesh) मध्ये जाण्याचा प्रवास टाळला पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासाच्या सल्ल्यात सांगितलं आहे की,'कोरोना महामारी आणि दहशतवाद या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे या देशांमध्ये प्रवास करताना पुर्नविचार करावा. तसेच सरकार इतर काही देशांमध्ये प्रवास करण्यावर बंदी आणण्याच्या तयारीत आहे.'


Level 4 मध्ये भारताचा समावेश 


अमेरिकेच्या (America) परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरस (Corona Virus) च्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही भारत लेवल ४ वर आहे. यामुळे भारतात प्रवास करणं धोकादायक आहे. 


मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'भारत-पाकिस्तान सीमेवर जीवाला धोका आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकांना तेथे जावू नये. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना अफगाणिस्तानमध्येही प्रवास करण्यास बंदी केली आहे.' 



  


बलूचिस्तानपासून दूर राहण्याचा सल्ला 


दक्षिण एशियातील चार देशांबाबत ट्रॅव्हल एडवाइजरी अपडेट करताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी वेगवेगळे सल्ले देण्यात आले. यामध्ये कोविड, दहशतवाद आणि जातीय हिंसावादामुळे पाकिस्तानात प्रवास करताना विचार करावा. अमेरिकेतील नागरिकांना दहशतवाद आणि अपहरणाच्या घटना लक्षात घेता बलूचिस्तान आणि खैबर प्रांतात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. 


Border Areas मध्ये जाण्यास भीती 


बायडन प्रशासनाने आपल्या नागरिकांना दहशतवाद आणि याच्याशी निगडीत सुरू असलेला संघर्ष या वादावरून भारत-पाकिस्तान सीमेच्या लगद असलेल्या भागांमध्ये जाण्यास मनाई केली आहे. प्रशासनाने भारत-पाकिस्तान सीमेवर प्रवास करण्यास बंदी आणली आहे.