Lashawn Thompson: अनेकदा लाकडी टेबल, खुर्च्या, कपाट तसेच घरातील अनेक वस्तूंना ढेकूण पोखरतात. ढेकूण हा कीटक माणसाचं रक्त शोषून घेतो. घरात ढेखणांचा प्रादुर्भावर झाल्यास अनेक जण त्रस्त होतात. ढेकणांनी चावा घेतल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला आहे असं सांगितल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, ही असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. ढेकणांनी माणसाला चावा घेवून मारुन टाकले आहे. अमेरिकेत ही धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील अटलांटा येथील एका तुरुंगात ही धक्कादायक घटना घडली आहे. तुरुंगात कैद असलेल्या एका कैद्यांचा किटकांनी चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. द गार्डियन या वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


लॅशोन थॉम्पसन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 35 वर्षीय लॅशोन थॉम्पसन याला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. लॅशोन थॉम्पसन याच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. लॅशोन थॉम्पसन ह फुल्टन काउंटी जेलमध्ये कैद होता. थॉम्पसन मानसिक आजारी असल्याने त्याला मनोरुग्णालयात ठेवण्यात आले होते.  13 सप्टेंबर 2022 रोजी तो त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला होता.


लॅशोन थॉम्पसन याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. लॅशोन थॉम्पसन याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते त्या कोठडीत प्राणी देखील राहू शकत नाहीत. या कोठडीत खूपच कीटक आणि ढेकूण होते. ढेकणांनी लॅशोन थॉम्पसन याला चावा घेतला आणि त्याचे मोठ्या प्रमाणात रक्त शोषून घेतले यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 


लॅशोन थॉम्पसन याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुंटुंबियांनी चौकशीची मागणी केली. यानंतर लॅशोन थॉम्पसन याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये लॅशोन थॉम्पसन याच्या शरीरावर कीटकांनी चावा घेतल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.लॅशोन थॉम्पसन याच्याकडे जेल प्रशासनाचे लक्ष नव्हते. तो मनोरुग्ण असल्या कारणाणुळे जेल कर्मचारी त्याची विचारपूस करत नव्हते. त्याच्या कोठडीची अत्यंत भयानक अवस्था होती. जेल प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप लॅशोन थॉम्पसन याच्या कुटुंबियांनी केला आहे. 


लॅशोन थॉम्पसन याच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लॅशोन थॉम्पसन या ला भेटालया गेलो असता त्याच्या शरीराभोवती हजारो किटक आढळून आले होते असे त्याच्या नातेवाईकांनी कोर्टात सांगितले. कोर्टाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.