वॉशिंग्टन : अमेरिकेनं पाकिस्तानाला देण्यात येणारी २५ करोड ५० लाख डॉलरची सैन्य मदत राशी सध्या रोखलीय. यामुळे पाकिस्तानला जोरदार चपराक बसलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईच हाऊसनं या वृत्ताला दुजोरा देताना, पाकिस्तान आपल्या जमिनीवर दहशतवादाला कोणत्या प्रकारे उत्तर देणार यावर, अशी सहाय्यता निधी अवलंबून असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानावर अमेरिकेला 'खोटं आणि कपट' यांच्याशिवाय काहीही न देण्याचं आणि १५ वर्षांत ३३ अरब डॉलरची सहाय्यता निधी देण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांना 'आसरा' देण्याचा आरोप केलाय. यानंतर अमेरिकेनं या गोष्टीची पृष्टी केलीय. 


एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'अमेरिकेला सध्या पाकिस्तानला दिली जाणारी २५ करोड ५० लाख डॉलर्सची राशि खर्च करण्याची इच्छा नाही... राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केल्याप्रमाणे अमेरिकेला ही आशा आहे की पाकिस्तान आपल्या जमिनीवर दहशतवाद्यांविरुद्ध आणि फुटीरतावाद्यांविरुद ठोस पावलं उचलेलं... आणि अमेरिका प्रशासन पाकिस्तानाच्या सहकार्य स्तराची समीक्षा करत राहील'.