वॉशिंग्टन : इंफ्लुएंजा च्या चार प्रमुख प्रकारांच्या मूळ जीन्स एकत्रित करून एक लस बनवण्यात आली आहे. ही लस अत्यंत प्रभावी असून गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अमेरिकेतील नेब्रास्का-लिंकन विश्वविद्यालयाने या लसीचा प्रयोग उंदरांवर केला. त्यामुळे ते गंभीर आजरांपासून बचावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्याचबरोबर ज्यांना ही लसीची अधिक मात्रा दिली ते आजारी देखील पडले नाहीत. तर दुसरीकडे उंदरांना फ्लू ची सामान्य लस किंवा नाकात स्प्रे मारण्यात आला  ते उंदीर आजारी पडले आणि व्हायरसच्या संपर्कात येऊन मरण पावले. त्यामुळे संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, सामान्य लसीचा गंभीर आजारांवर काही परिणाम होत नाही. 


नेब्रास्का-लिंकन विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्रोफेसर एरिक वीवर यांनी सांगितले की, "असे जरी असले तरी ही लस मानवी शरीरावर कितपत प्रभावी ठरेल, हे सांगण्यासाठी अजून काही अवधी लागेल. मात्र प्रयोगानुसार ही लस मानवी शरीरावर देखील यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक आहे."