मुंबई: बुधवारी सकाळी सोशल मीडियावर ठळक बातम्यांसलोबतच चर्चा सुरु झढाली ती म्हणजे युट्यूब बंद पडल्याची. अमेरिका, इंग्लंड, आशिया आणि ऑस्ट्रेलियासह जगभरात युट्यूब काही काळासाठी बंद असल्याचं पाहिलं गेलं. जवळपास तासाभराहून अधिक वेळासाठी ही सेवा ठप्प झाल्यामुळे सतत इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा ठप्प झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. 


मुख्य म्हणजे व्हिडिओच्या दृष्टीने अत्यंत विश्वासार्ह अशा या सेवेत व्यत्यय येत असल्याचं लक्षात येताच नेटकऱ्यांनी लगेचच गुगलला याविषयीचे प्रश्न विचारले. 


स्क्रीनवर ERROR 500 असा मेसेज आल्यामुळे त्याचे स्क्रीनशॉटही अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा विषय उचलून धरला. 



युट्यूब कडूनही अचानक सेवेत आलेल्या या व्यत्ययासाठी माफी मागण्यात आली असून, सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं. 



जवळपास एक तासाभरातच ही सेवा पुन्हा पूर्वतही करण्यात आली, जेव्हा गोंधळलेल्या नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.