हॉस्पिटलच्या गार्डने चक्क भूतासाठी उघडलं दार, Video पाहून अंगावर येतो काटा
Ghost Viral Video : सोशल मीडियावर भूताचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. भूत कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतोय.
Ghost In The Hospital Viral Video : देवाची जशी श्रद्धा आहे, तसंच अनेक जण भूत आहे यावर विश्वास ठेवतात. भूताचं नाव घेतलं तरी आपली झोप उडते. अनेकांना भूताची (Ghost Video) एवढी भीती वाटते की ते भूताचे कुठलेही चित्रपट बघतं नाही किंवा भूताच्या गोष्टीही करत नाही. असं म्हटलं जातं की जर कोणाची मरण्यापूर्वी इच्छा पूर्ण राहिली किंवा तो अचानक जगातून निघून गेला तर त्याची आत्मा ही पुन्हा येते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media ) झालेल्या व्हिडीओमध्ये जाणवतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भूत कॅमेऱ्यात (camera) कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सची (Users) हवागुल झाली आहे.
ती परत आली!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलचा (Hospital) दरवाजा उघडतो. कोणी तरी आत येतं. पेन्शटला पाहून सुरक्षारक्षक (security guard) उठून नावाची नोंद घेतो आणि काही तरी बोलतो. पण आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, तो गार्ड नक्की कोणाशी काही कळतं नाही आहे. गार्डच्या कृत्यामुळे भूत आलाची चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हॉस्पिटलमधील ही विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पुढे बघू शकता, तो गार्ड बोलत बोलत पुढे जातो आणि व्हिलचेअरवर कोणाला तरी बसायला सांगतो आणि तिथून निघून जातो.
हेही वाचा - Video : वाहेगुरू, वाहेगुरु...म्हणत रुममधून शहनाज गिलने काढला पळ
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे. की हे कुठल्या चित्रपटाचं दृश्यं आहे की मुद्दामून कोणी घडून आणलं आहे. याबद्दल काही सांगता येतं नाही. ही विचित्र घटना रात्री 3 वाजताची असून ही घटना ब्यूनस आयर्समधील फिनोचियाटो सॅनेटोरियममधील (Finocchiato Sanatorium) खाजगी हॉस्पिटलमधील आहे. (Video Ghost Patient In The Hospital Viral on social media)
दरम्यान या हॉस्पिटलच्या लोकांशी या व्हिडीओ संदर्भात विचारणा केली असता. हॉस्पिटलचा दरवाजा टेक्निकल फॉल्टमुळे रात्रभर सतत उघडत होतं असं सांगण्यात आलं आहे. शिवाय व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या गार्डने रजिस्टरवर कोणाचं नाव लिहिलं आहे. त्यावरीही हॉस्पिटलकडून खंडन करण्यात आलं आहे. दरम्यान या व्हिडीओमुळे भूत खरंच असतो, अशी चर्चा रंगली आहे.