Viral Video : धक्कादायक, प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना केली Terrorists `कसाब`शी; पुढे जे घडलं ते...
Karnataka News : देशातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्राध्यपकाला माणुसकीचा विसर पडल्यानंतर त्याने मुस्लिम विद्यार्थ्याची थेट कसाबशी तुलना केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Muslim Student Confronts Professor : देशात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका प्राध्यपकाने भर क्लासरुमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यीची तुलना दहशतवाशी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. प्राध्यपकाच्या या वक्तव्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. हा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील (Karnataka ) उडीपीमधील मणिपाल विद्यापीठात (Manipal University) घडला.
नेमकं काय झालं?
प्राध्यपकाने (Professor) भरक्लासरुममध्ये मुस्लिम विद्यार्थ्याची (Student) तुलाना मुंबईचा गुन्हेगार कसाब याच्याशी केली. "अरे, तू कसाबसारखाच आहेस." त्यानंतर विद्यार्थी नाराज झाला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्राध्यापक विद्यार्थ्याला म्हणताना दिसत आहे की, ''तू तर माझ्या मुला सारखा आहे.''यावर विद्यार्थी म्हणतो की, ''नाही, कोणताही वडील आपल्या मुलासाठी असे शब्द वापरणार नाही. हा विनोद नाही. मुस्लिम असल्यामुळे असे टोमणे कधीतरी ऐकावे लागतात. हे अजिबात गमतीशीर नाही.''
हेही वाचा - Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?
संतप्त विद्यार्थी पुन्हा बोलतो की, ''तुम्ही तुमच्या मुलाशीही असेच बोलता का? त्याला तुम्ही दहशतवादी (Terrorist) नावाने हाक माराल का? इतक्या लोकांसमोर तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अशी भाषा वापरू शकत नाही.''
ही घटना 25 नोव्हेंबरला घडली आहे. या घटनेची कॉलेजकडून दखल घेण्यात आली आणि प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं. दरम्यान 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर (Mumbai attack) जिवंत पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) ...याबद्दल कोणालाही माहिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अजमल कसाब याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.
खरं या व्हिडिओमध्ये नेमकं प्राध्यपाकांनी काय म्हटलं ते स्पष्ट होतं नाही. शिवाय जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यपाकाचा वाद सुरु होता तेव्हा क्लासरुममधील एकाने हा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने प्राध्यपकावर कारवाई केली.