Viral Video: सोशल मीडिया हा अनेक वेगवेगळ्या घटनांच्या व्हिडीओचा खजिना आहे. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही रडवतात आणि काही व्हिडीओ भीतीदायक असतात. पण या सोशल मीडियावर कायम स्मरणात राहातील असेही काही व्हिडीओ आपण पाहिले आहेत. विमानातील अनेक मजेदार आणि मनाला भिडणारे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर बघितले आहेत. मदर्स डेच्या निमित्ताचा दिवशी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो आठवतो का तुम्हाला, ज्यात आई आणि मुलाच्या जोडीने एकत्र विमान उडवत गगन भरारी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हा व्हिडीओ अतिशय भावनिक आहे. पायलटसाठी त्याचं विमान आणि प्रवासी हे आयुष्यातील खूप खास गोष्ट असते. अशात जर त्या पायलटची करीयलमधील शेवटची गगन भरारी असेल तर त्याचासाठी तो खूप भावनिक क्षण असतो. या व्हिडीओमधील पायलटने शेवटची गगन भरारी घेण्यापूर्वी प्रवाशांसमोर छोटसं भाषण केलं. या पायलटचं हे भाषण ऐकून इमोशनल व्हायला होतो. हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.


पायलट झाला भावूक


उडाण भरण्यापूर्वी पायलट विमानातील सर्व प्रवासांशी संवाद साधतो. तो म्हणतो, या विमानात 1976 मध्ये जन्मलेले किती लोकं आहेत. त्यानंतर विमानातील अशा अनेक लोकांना पाहून तो म्हणाला यात अनेक वृद्ध लोक बसली आहेत. 1976 मध्ये मी एअर फोर्समध्ये ट्रेनिंग फ्लाइटची पहिली उड्डाण भरली होती. आता  43 वर्षानंतर मी माझ्या  कारकिर्दीतील शेवटचे उड्डाण भरणार आहे. हे ऐकल्यानंतर विमानात एकच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्यानंतर पायलट म्हणाला की, जर तुम्ही विचार करत असाल की आपल्या हा प्रवास सुरक्षित असेल का तर, चिंता करु नका. ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित उड्डाण आहे. कारण या विमानात माझी बायको आणि मुलं प्रवास करत आहेत. पालयटचा हा सेंस ऑफ ह्यूमर विमानातील प्रवाशांना खूप आवडला. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स भावूक झाले. 


सोशल मीडियावर पालयटचा हा अंदाज यूजर्संना खूप आवडतं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो यूजर्सने पसंद केला आहे. तर कमेंट सेक्शनमध्येही यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.