Viral Video : सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही व्हिडीओ पाहून संताप होतो. तर काही व्हिडीओमधून आपल्याला शिकायला मिळतं. तसंच कधी कोणी स्टाइल मारायला जातो आणि आपलच हसू करु घेतो असे मजेदार व्हिडीओ पण आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.


काय आहे या व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पण बाईकवरुन जाताना स्टाइल मारता का?. मग हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये स्टाइलच्या चक्करमध्ये बाईकस्वार आणि त्याचा मागे बसलेली मैत्रीण, ही गंमतीचा भाग बनतात. या व्हिडीओमधील तरुण आपल्या मैत्रिणीला बाईकवरून घेऊन जात असताना त्यांचा स्वॅग बघण्यासारखा आहे. तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या बाईकवर असणाऱ्या तरुणाला जरा पण शंका नव्हती की पुढच्या क्षणात त्याचा सोबत काय होणार आहेत ते.


नजर हटी...


तो तरुण बाईकवर जात असताना अचानक जोरदार स्पीडमध्ये असलेल्या दुसऱ्या बाईकला जाऊन धडकतो. त्यानंतर तरुण आणि तरुणी रस्त्यावर जोरदार पडतात. हा अतिउत्साह तरुण बाईकवरुन स्टंट दाखवण्याचा प्रयत्नात असताना त्याचा सोबत ही दुर्घटना घडली.


स्टंटच्या मोहामध्ये तरुणाची रस्त्यावर फजिती होते. म्हणून म्हणतात 'नजर हटी और दुर्घटना घटी'. ती या व्हिडीओमध्ये दिसून येते. त्यामुळे आपण जर असं काही करत असाल तर वेळीच सावध व्हा.