Vijay Mallya Bankrupt : मोठा दणका! लंडन कोर्टाकडून `दिवाळखोर` घोषित
विजय माल्ल्याची संपत्ती जप्त होणार?
मुंबई : भारतातील विविध बँकांमधून कोट्यावधींच कर्ज घेऊन फरार झालेला किंग्जफिशर एअरलाईन्सचा मालक विजय माल्याला (Vijay Mallya) मोठा दणका बसला आहे. लंडन उच्च न्यायालयाने विजय माल्याला मोठात झटका दिला आहे. विजय माल्ल्याला दिवाळखोर (Bankrupt) घोषित केलं आहे. (Vijay Mallya bankrupt : UK court declares allowing Indian banks to pursue his assets worldwide ) न्यायालयाने हे घोषित करून भारतातील विविध बँकांचं (Indian Banks) म्हणून न्यायालयाने मान्य केलं आहे.
आता यामुळे भारतीय स्टेट बँक (State Bank of India) च्या कंसोर्टियमने विजय माल्ल्याला दिलेल्या कर्जाची वसुली करण्यास मदत होईल. माल्ल्याची संपत्ती जप्त केली जाऊ शकते. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात काही भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती. भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं.
या बँकांनी विजय माल्ल्याला दिलंय कर्ज
स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 विविध बँकांचं कर्ज विजय मल्ल्यानं घेतलं होतं. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, जेएम फायनान्शिअल यांचा समावेश आहे.