Egypt Pyramid: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सापडली भुयार, अनेक रहस्य उलगडणार!
Egypt Discoveries: इजिप्त देशाचा इतिहास सगळ्यांना आकर्षित करतो येथे समोर आलेल्या माहितीनुसार एक गुप्त भुयार (Hidden Corridor) सापडेल आहे, त्यातून आता अनेक रहस्य उलगडणार आहेत. या भुयाराचा फोटोही (Egypt History) समोर आला आहे.
Egypt Discoveries: आपल्या देशात-जगात अशी अनेक रहस्य (World Mysteries) आहेत ज्यांच्याबद्दल अनेकदा बोलले आणि लिहिले जाते. त्यातून आपल्याला मानवी मनाला कूतुहल वाटले अशा अनेक अनेक गोष्टीही या जगात आहेत. परंतु आपल्याला कायमच ऐतिहासिक गोष्टी जास्त आकर्षित करतात. आपल्यालाही अशा काही ऐतिहासिक गोष्टींबद्दल कुतूहल वाटतं राहते. इजिप्त या देशाविषयीही अनेक इतिहास संशोधकांना तसेच इतिहासप्रेमींनाही कुतूहल आणि आकर्षण असते. समोर आलेल्या माहितीनुसार, इजिप्तच्या गिझा पिरॅमिड (Giza Pyramid) येथे एक रहस्यमय गुहा सापडली आहे. इजिप्त या देशाला अनेक वर्षांचा इतिहास आहे.
तेथील प्राचीन संस्कृतीचंही अनेकांना आकर्षण आहे. येथील पिरॅमिड तर आहेतच पण त्याचसोबत येथील ममीज (Egypt Ancient Culture) आणि त्यांच्याविषयीची न समोर आलेली माहिती ही अनेकांना आकर्षित करते. इतिहास संशोधकही येथील संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत नवे संशोधन करत आहेत.
नुकत्याच आलेल्या एका माहितीनुसार, इजिप्तशीयन पुरात्वविभागानं सांगितले आहे की, द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या (Giza Pyramid Entrance) वर एक सुरंग सापडली आहे. या सुरंगाचे माप पाहिले तर 9 मीटर लांब आणि 2.1 रूंद इतके आहे. या सुरंगाचा शोध कॉस्मॅटिक रेच्या (Cosmatic Ray) मदतीनं लागला आहे. इंग्रजी वेबसाईटनं याची माहिती देताना याच्या प्रवेशाच्या द्वारानजीक गुप्त भुयारी मार्ग सापडला असल्याचे नमुद केले आहे.
समोर अशीही एक माहिती आली आहे की उर्जा किरणांच्या तंत्रानं हा शोध लावण्यात आला आहे. त्यानुसार, रडार (Radar) आणि अल्ट्रासाऊंड सिस्टिम मशीनचा (Ultrasound System) वापर करण्यात आला आहे. याचा अधिक सोप्पा तपास व्हावा म्हणून दगडांच्या आतमध्ये कॅमेरा (Hidden Camera) बसवला आहे. या संशोधनातून अनेक रहस्ये ही समोर येणार आहेत त्यातून आता या संशोधनाच्या साहाय्यानं या 4500 वर्षांहून (4500 Year old Pyramid) अधिक जून्या गिझा पिरॅमिडचेही रहस्य उघडीस येणार आहे. यातून जुन्या काही गोष्टींचा नव्यानंही शोध लागू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनं हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
याचा शोध हा 2016-17 दरम्यानही मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. तेव्हा 30 मीटरचे एक असे एक चेंबर शोधण्यात आले होते. हे चेंबर 90 मीटर उंच होते. जे कुफू पिरॅमिडच्या (Pyramid of Khufu) आत सापडले होते.