Viral Contact Lens Story: आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण जराशी चूक आपल्या डोळ्यांसाठी ही महागात पडू शकते. आपल्यापैंकी अनेकांना कॉन्टॅक्ट लेन्स लावावे लागतात त्यामुळे आपल्याला चष्मा लावायची काहीच गरज भासत नाही. हल्ली कॉन्टॅन्ट लेन्स घालणं हे फार स्टाईलचं गणितही झालं आहे त्यामुळे कॉन्टॅन्ट लेन्स (Contact Lens) लावण्याची एक नवी स्टाईल ट्रेण्ड होत असते. परंतु जर का आपण कधीही अवेळी कॉन्टॅक्ट लेन्स लावलेत तर त्याचे दुष्पपरिणामही आपल्याला भोगावे लागतात. असाच या कॉन्टॅक्ट लेन्सचा (Side Effects of Contact Lens) दुष्परिणाम एक तरूणाला भोगावा लागला आहे. अशाच एका तरूणाला आपल्या डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावून रात्री झोपणं महागात पडलं आहे. त्यानं आपला एक डोळा गमावला आहे आणि त्याबद्दलची एक पोस्ट त्यानं इन्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात त्यानं आपल्यासोबत झालेल्या अपघाताबद्दल कथन केलं आहे. (viral news a man sleeps with contact lens parasites started eating his eye read what really happened)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याकडे आता सगळेच कॉम्प्यूटरवर बसून काम करतात. त्याशिवाय आपलं काम हे पुर्ण होत नाही त्यातून सगळीकडेच आणि खासकरून तरूणांमध्ये स्क्रिन टाईम (Screen Time) खूप वाढलं आहे. त्यामुळे आपल्याला डोळ्यावरही चष्मा येऊ लागला आहे. परंतु चष्मा लावण्यापेक्षा अनेक लोकं ही लेन्स लावणं पसंत करतात. काहींना याची जाणीव पटकन होत नाही की आपल्याला रात्री चष्मा काढून झोपणं हे महत्त्वाचे आहे परंतु अनेक जण कॉन्टॅक्ट लेन्स न काढून ठेवून झोपायची चूक करतात परंतु असं केल्यानं तुमच्या डोळ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचे भान काही लोकांना नसते. 


माइक क्रुमहोल्झ (Mike Cromhonz) या एका 21 वर्षीय तरूणानं आपल्या इन्टाग्राम पोस्टवरून (Instagram Post) अशीच एक धक्कादायक घटना शेअर केली आहे जी खुद्द त्याच्यासोबतच घडली आहे. माइक क्रुमहोल्झ रात्री कॉन्टॅक्ट लेन्स लावले होते आणि त्यामुळे त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. माइक क्रुमहोल्झ गेल्या अनेक वर्षांपासून कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत आहे. परंतु त्यानं नकळत कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना एक चूक केली आहे. तो एकदा काम करता करता झोपलाच आणि त्यात त्यानं कॉन्टॅक्ट लेन्स घातले होते. 


त्याची ही एक चूक त्याला महागात पडली आहे. त्याच्या डोळ्यामध्ये यामुळे मांस खाणारा अकांथामोबा केरायटिस (Acanthamoeba keratitis) नावाचा परजीवी (Parasite) विकसित झाला आणि पाहता पाहता त्यानं त्याचा डोळा खायला सुरूवात केली. त्यामुळे त्याची दृष्टी गेली आणि त्यानं एक डोळा दुर्देवानं गमावला. 


माइक क्रुमहोल्झ नक्की काय म्हणाला? 


जेव्हा मी झोपेतून सकाळी उठलो तेव्हा माझा डोळा जास्त लाल झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी डोळ्यात HSV1 असल्याचे मला वाटले. त्यानंतर मी डॉक्टर्सना भेटलो. पाच वेगवेगळे नेत्ररोग तज्ञ आणि दोन कॉर्निया तज्ञ यांना भेटल्यानंतर डोळ्यामध्ये अकांथामोबा केरायटिस (Acanthamoeba keratitis) हा परजीवी असल्याचे निदान झाले. माझ्या डोळ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून मी आत्ता घरी बसून आहे. मला काम करता येत नाही, माझं बाहेर जाणं बंद झालं आहे. 


अशी चूक तुम्ही करू नका - 


आपल्यावरील उपचारांसाठी तो लोकांकडे मदत मागतो आहे. त्यातील काही रक्कम जमा झाली असल्याचे त्याने सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्याने सर्वांना कॉन्टॅक्ट लेन्स काढून झोपण्याचे आवाहन केलं आहे.