वॉशिंग्टन : लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळं घालण्याची सवय असते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? ही घड्याळामुळे कधी कोणाचे प्राण वाचले आहे. खरेतर आपण अनेकदा असे बोलतो की, महागड्या गोष्टींचा शौक का ठेवायचा. परंतु कधी कधी अशा गोष्टी तुमचे प्राण देखील वाचवू शकतो, हे मात्र आता सिद्ध झालं आहे. कारण अमेरिकेतील एका माणसाचे Apple Watch मुळे प्राण वाचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? एखादं घड्याळ कसा काय कोणाचे प्राण वाचवू शकतो?  एका मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा तो माणूस खाली पडला, तेव्हा त्याच्या घड्याळाने आपत्कालीन सेवेवर ऑटोमॅटीक कॉल लावला, ज्यामुळे त्याचे प्राण वाचवणे शक्य झाले.


पहिल्यांदा अशी घटना घडली नाही. कारण या पूर्वी बऱ्याचदा Apple watch ने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे आणि कधीकधी Apple Watchने त्याच्या यूझर्सचे त्यांच्या नकळत देखील अनेक समस्यांपासून वाचवले आहे.


AppleInsiderच्या वृत्तानुसार, या 78 वर्षीय व्यक्तीचे नाव माईक यागर आहे. यांना समरफील्ड फायर डिपार्टमेंट वाचवले गेले आहे. परंतु त्यांचे घड्याळ आपत्कालीन मॅसेज देखील पाठवू शकत हे त्यांना माहित नव्हते.


माईक यागरने फॉक्स न्यूजला सांगितले, "जेव्हा हे लोकं माझा जिव वाचवण्यासाठी माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना हाच प्रश्न विचारला की, तुम्ही इथे कसे? तुम्हाला हे कसं कळलं? आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या घड्याळाने आम्हाला एक संदेश पाठवला आहे."



माईक यॅगर आपल्या नेहमीच्या रस्त्याने चालत असताना ते अचानक पडले, ज्यामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. ही घटन घडताना माईक यांचा घड्याळाला 'fall detection' झाले. सुरवातीला घड्याळाने माईक यांना अलर्ट दिला. तेव्हा माईकने घड्याळाला काही उत्तर दिले नाही. त्याच बरोबर काही हालचाल होत नसल्याचे घड्याळाने लगेच 911 ला Emergency call लावला आणि अशा प्रकारे माईकचे प्राण वाचले.