मुंबई : लग्न म्हटलं की, लोकं त्यासाठी खूप खर्च करतात. यात होणारा खर्च चांगल्या चांगल्या लोकांचे खिसे रिकामी करतो. कारण लग्नात प्रत्येकाला असं वाटत असतं की, सगळ्या गोष्टी एकदम पर्फेक्ट व्हाव्यात. कोणाला काहीही कमी पडू नये. तसेच लोकांच्या खाण्या पिण्याची देखील चांगली सोय व्हावी यासाठी लोकं भरपूर पैसे देखील खर्च करतात. काही लोक तर दिखाव्यासाठी आपली ऐपत नसली तरी देखील लग्नात भला मोठा खर्च करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये सर्वात मोठा खर्च होतो तो खाण्याचा गोष्टींवर. कारण जेवण चांगले नसेल किंवा व्यवस्था चांगली केलेली नसेल तरी देखील लोकं लग्नाला नावे ठेवतात. त्यामुळे असे घडू नये म्हणून लोकं त्यासाठी सर्वधीक पैसा खर्च करतात. परंतु बऱ्याचदा असे घडते की, आमंत्रण मिळून देखील काही पाहूणे लग्नात उपस्थीत राहात नाही. अशा स्थितीत अन्न वाया होतो.


बऱ्याच लग्नात असे घडते. आपण त्याला काही करु शकत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का? लग्नातील जेवण वाया गेलं म्हणून एका वधूने लग्नात न आलेल्या एका नातेवाईकाला 17 हजार रुपयांचे बिल पाठवले.


हो हे खरं आहे. ही घटना युनायटेड किंगडम मधील आहे. जेथे एका वधून आमंत्रण देऊन देखील त्यांच्या लग्नात न आल्यामुळे तिच्या नातेवाईकांना 17 हजार रुपयांचे बिल पाठवले.


कोणत्याही कार्यक्रमात प्रत्येकजण आपल्या पाहुण्यांच्या यादीनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. कोणत्याही अतिथीसाठी कोणतीही गोष्ट कमी पडू नये अशीच लोकं व्यवस्था करतात, जेणेकरून प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेतली जाईल आणि कोणीही उपाशी रहाणार नाही.


पण जेव्हा पाहुणे व्यवस्थेनुसार येत नाहीत, तेव्हा जेवणापासून ते खाण्या पिण्याच्या अन्य गोष्टीचे नुकसान होते. ज्यामुळे वधू आणि वर आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकसान सहन करावे लागते.


परंतु या वधूने मात्र लग्नाला न आलेल्या आपल्या नातेवाईकाकडून आपली  नुकसान भरपाई गोळा केली.


वास्तविक, वधूने तिच्या लग्नासाठी सर्व उत्तम व्यवस्था केली होती. वधूने प्रत्येक दोन पाहुण्यांसाठी 175 युरो (सुमारे 17 हजार रुपये) खर्च करून त्यांच्यासाठी रिसेप्शन डिनर आणि प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली होती. परंतु ते नातेवाईक न आल्याने तिचे 17 हजार वाया गेले.


अशा परिस्थितीत, जेव्हा पाहुणे आमंत्रण देऊनही रिसेप्शन पार्टीला पोहोचले नाहीत, तेव्हा वधूने त्यांच्या घरी या गोष्टींसाठी पैसे वसूल करण्यासाठी बिल पाठवले.


सोशल मीडिया साइट Reddit वर, रिसेप्शन पार्टीला उपस्थित नसलेल्या पाहुण्याने वधूने पाठवलेल्या पावतीची प्रत शेअर केली आहे.


या इन्व्हॉइसमध्ये लिहिले आहे, ‘no call, no show guest.’ यासोबतच असे लिहिले आहे की, ते लग्नाच्या रिसेप्शन डिनरला उपस्थित राहिले नाही आणि दोन जागा रिक्त राहिल्या. ज्यामुळे त्यांना हे बिल पाठवले जात आहे.



यासह, चालानच्या इनव्हॉइसच्या नोट्स विभागात लिहिले आहे, 'तुम्हाला हे बिल भरावे लागेल कारण तुम्ही आम्हाला हे आधी सांगितले नाही की, तुम्ही पार्टीला उपस्थित राहणार नाही. त्यामुळे हे बिल लवकरात लवकर जमा करा.' इनव्हॉइसमध्ये पुढे लिहिले आहे, 'तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आपण कसे पैसे द्याल ते आम्हाला कळवा. धन्यवाद!'


आता या इनव्हॉइसची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचप्रमाने लोक भारतात लग्नात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि संभाव्य गोष्टींना कमेंट्स करुन सांगत आहेत.