नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेय पिणे ही सर्वसाधारण बाब आहे. परंतु यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना करणे अवघड आहे. चीनमध्ये अशीच एक घटना घडली आहे. ज्यामध्ये 22 वर्षीय मुलाचा कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर मृत्यू झाला आहे. दरम्यान मुलाची तब्बेत बिगडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु 18 तासांच्या उपचाराच्या प्रयत्नानंतरही डॉक्टर त्या मुलाचे प्राण वाचवण्यास अपयशी ठरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 मिनिटात पिले दीड लीटर पाणी
चीनमधील हा मुलगा उन्हाळ्यामुळे हैराण होता. त्यामुळे थंड वाटावं म्हणून 10 मिनिटात त्यांने दीड लीटर कोकाकोला संपवले. 


त्यानंतर त्याला असहाय्य त्रास जाणवू लागला. त्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. एवढ्या कमी कालावधीत जास्त प्रमाणात कोल्डड्रिंक पिल्याने मुलाच्या हृदयाचे ठोके वाढले. ब्लडप्रेशर कमी झाले. 


तसेच रुग्णालयात पोहचल्यानंतरही डॉक्टरांसमोर तो वेगाने श्वास घेत होता. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली होती.


गॅसने घेतला प्राण
मिरर युके रिपोर्टच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी म्हटले की,  जास्त प्रमाणत कोल्डड्रिंक पिल्याने मुलाच्या शरीरात गॅस तयार झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याची किडनी डॅमेज झाली होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्याच्या 18 तासात मुलाचा मृत्यू झाला.