कर्मचाऱ्याच्या पगाराची किंमत बादलीभर चिल्लरने मोजली, काय आहे हा संपूर्ण प्रकार
परंतु एका व्यक्ती सोबत असं काही घडलं ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
साऊथ विल्यम स्ट्रीट : पैसे कोणाला नको असतात, जगाती प्रत्येक व्यक्ती ही आपले पोट भरण्यासाठी काम करते आणि पोट तेव्हाच भरता येते जेव्हा तुमच्या हातात पैसे असतील. परंतु पैसे कमावण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मेहनत करावी लागते, काम करावे लागते. आपल्याला पैसे कमावण्यासाठी महिनाभर काम करावे लागते, त्यानंतर महिन्याच्या अखेरीस किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरूवातीला आपल्याला आपला पगार मिळतो. ज्यामुळे पगाराची तारीख कधी येतेय आणि आपल्याला कधी पैसे मिळतंय याकडेच पगारदार वर्गाचं लक्ष असतं.
परंतु एका व्यक्ती सोबत असं काही घडलं ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. काही मालक आपल्या कामगारांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. Rian Keogh नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.
यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले - जर कोणाला माहित करुन घ्यायचे आहे की, साऊथ विल्यम स्ट्रीटमधील Alfies मध्ये काम करणे कसे असते, तर मी तुम्हाला सांगतो की, फायनल सॅलरीसाठी हफ्ताभर थांबल्यानंतर आणि हातापाया पडल्यानंतर मला माझी सॅलरी मिळाली. परंतु ते मिळालं 5 सेंटच्या कॉइनच्या रुपात बादली भरुन.
ही व्यक्ती सांगते की, तो एका हॉटेलमध्ये काम करायचा. नोकरी सोडल्यानंतर त्याला पैशांची गरज होती आणि तो आपल्या मालकाला अंतिम पगार देण्याची विनंती करत होता. पण त्याचा मालक आधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिला आणि मग एक दिवस तो पगार रोख स्वरूपात देण्यास तयार झाला. पगाराच्या नावाखाली त्या व्यक्तीला हॉटेलमध्ये बोलावून त्यानं 29.8 किलोची पैशाने भरलेली बादली दिली.
या व्यक्तीने नाण्यांनी भरलेल्या बादलीसह मालकाच्या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल फोटोला लाईक केले आहे. त्याचबरोबर त्याचे मीम्स देखील बनवण्यात येत आहे.