Viral News : बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी वेळ नाही म्हणून गर्लफ्रेंडने लढवली अनोखी शक्कल
Trending Viral News : तिच्याकडे बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी वेळ नाही म्हणून गर्लफ्रेंडने अनोखी शक्कल लढवली आहे. ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Trending Viral News : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं आपण कायम ऐकत आलो आहोत. प्रेमाचं नातं हे विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. प्रेमातील गोडवा वाढावा आणि एकमेकांमध्ये आपण गुंतून राहावं म्हणून त्यात रोमान्स असतो. प्रेमात एकमेकांना वेळ देणं फार गरजेचं असतं. या दोघांच्या नात्यात तिसऱ्या कोणी आला तर ते नात संपुष्टात येतं. कुठल्याही गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड त्यांना आपल्या जोडीदाराला दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायला आवडतं नाही. अनेक वेळा साधी मैत्री असेल तरी आपल्याला त्या नात्याचाही त्रास होतो. पण एका तरुणीला स्वत:च्याच बॉयफ्रेंडसाठी नवी गर्लफ्रेंड शोधली आहे. यामागील कारण जाणून तर तुम्हाला धक्काच बसेल. (Viral News Having no time for romance she finds a new girlfriend for her boyfriend Trending news now)
दोघांत तिसरा..!!!
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चॅनेल बी ही एक कंटेंट क्रिएटर असून इन्स्टाग्रामवर तिचे 1 हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. सुमारे 2 वर्षांपूर्वी, तिने 'मोनोगामिश' नावाच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला असता. ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित एक रहस्य उघड केलं होतं. चॅनेलला तिने सांगितले की, ती आणि तिचा प्रियकर 9 वर्षांपासून एकमेकांसोबत होत. मात्र नोकरीच्या तणावामुळे ती प्रियकराला बिलकुल वेळ देऊ शकत नव्हती.
जॉबचं टेन्शन म्हणून तिने...
तिने सांगितलं की, ती एकाच वेळी 3 ठिकाणी नोकरी करत होती. त्यामुळे तिच्याजवळ बिलकुल वेळ नव्हता. त्यात प्रियकरासाठी त्याकडे देण्यासाठी वेळ नसल्याने नात्यात तणाव निर्माण झाला होता. काम करुन थकलेली ती जेव्हा घरी यायची तेव्हा घराची साफसफाई, रात्रीचं जेवण आणि कपडे धुणं यात ती व्यस्त असायची. त्यामुळे बॉयफ्रेंडसोबत रोमान्ससाठीही तिच्याकडे वेळ आणि ऊर्जा नसायची. त्यामुळे तिने ठरवलं की, बॉयफ्रेंडसाठी तिने नवीन गर्लफ्रेंड शोधण्याचं ठरवलं, जी तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करण्यासाठी कायम वेळ असेल.
सुरुवातीला त्यांच्या नात्यात काही अडचणी आल्या, पण नंतर त्यांचं नातं बहुरुपी त्यांनी निर्माण केलं. एक असं नात ज्यात दोघांसोबत अजून एकाचा सहभाग. हे नातं काही दिवस चांगलं होतं, पण 6 महिन्यांनंतर त्यांना कळलं की नात्यात गुंता निर्माण झाला आहे. तिने स्वतःशीच विचार केला की तिला हे नातं असंच चालू ठेवायचं आहे की नाही..? तिला हे नातं पुन्हा जुळवणं योग्य वाटलं. पण आता या नात्यात दुसरी ती गर्लफ्रेंड कोण असणार हा प्रश्न होता. चॅनेलला मुलगी तिच्यासारखी नको होती, पण जेव्हा तिच्या प्रियकराला एखादी स्त्री आवडते तेव्हा तिचा स्वभाव चॅनेलसारखाच व्हायचा. सुरुवातीच्या काही समस्यांनंतर, ते आता सहजतेने असे खुले नातेसंबंध सांभाळत पुढे जात आहेत.