केपटाऊन : दक्षिण आफ्रिका हा जरी आर्थिक परिस्थितीत सगळ्या देशांच्या मागे असला तरी, चालीरिती आणि त्यांच्या संविधानाने तो सगळ्या देशांच्या पुढे आहे. कारण आफ्रिकेत संमलिंगी लग्नाला देखील परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर येथील ट्रान्सजेंडर्सना देखील संपूर्ण हक्क मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने आणखी एक सामाजिक रूढी भंग करणारे पाऊल उचलले आहे. आता या देशात बहुपत्नी प्रथाही सुरू होणार आहे. म्हणजेच या देशात महिला या पुरषांप्रमाणेच एकापेक्षा जास्त पती करु शकतात अशी घोषणा येथील सरकारने केली आहे.


दक्षिण आफ्रिकेत पुरुषांकरता एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा कायदा आधीपासूनच आहे. परंतु आता सरकारने महिलांसाठी देखील हा कायदा अमलात आणण्याचे ठरवले आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या रुढ़िवादी संघटनांना या निर्णयाबद्दल राग आहे. त्यांच्या मते, या कायद्यामुळे दक्षिण आफ्रिकेची संस्कृती संपुष्टात येईल.


महिलांनी अनेक लग्न करण्याचा हा प्रस्ताव दक्षिण आफ्रिकेच्या गृह विभागाने दिला आहे आणि ग्रीन पेपरमध्ये देखील याचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेची घटना ही जगातील सर्वात पुढारलेल्या घटनांपैकी एक आहे.



आफ्रिकन ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते केनेथ मेसोहो म्हणाले की, यामुळे समाज नष्ट होईल. परंतु यासंदर्भात प्राध्यापक कोलिस मेकोको यांचे विधान अत्यंत रंजक आहे. ते म्हणाले की, "आफ्रिकन समाज खर्‍या अर्थाने समानतेसाठी तयार नाही. आम्हाला कळत नाही की, आम्ही अशा महिलांसोबत कसे वागू, ज्यांच्यावर आम्ही नियंत्रणच ठेवू शकत नाही हे आम्हाला माहित नाही."


दक्षिण आफ्रिकेच्या शेजारच्या झिम्बाब्वेमध्ये स्त्रियांनी एकापेक्षा जास्त पती असण्याची प्रथा ही आधी पासूनच आहे.