Viral News : लहानपणी प्रत्येकला सुपरहिरोची (Superhero) क्रेझ असते. कोणाला स्पायडरमॅन, कोणाला सुपरमॅन तर कोणाला बॅटमन आवडतात. सुपरहिरोसारखे कपडे आणण्यासाठी आपल्या पालकांच्या मागे हट्ट करतात. सुपरहिरोचे कपडे घालून त्यांच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न लहान मुलं करत असतात पण यातून एखादी दुर्घटनाही घडू शकते. स्पायडरमॅन (Spider Man) बनण्याच्या नादात तीन सख्ख्या लहान भावांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. एकाचवेळी तीन मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
बोलिव्हियातील चायांता भागातील ही दुर्देवी घटन आहे. आठ, दहा आणि बारा वर्षाचे सख्खे तीन भाऊ आपल्या आई-बाबांसोबत राहात होते. तिघांनाही स्पायडरमॅन पाहाण्याची प्रचंड आवड होती. पण या आवडीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. स्पायडरमॅन सारखं बनावं, त्याच्यासारखी स्टंट करावीत असं त्यांना वाटू लागलं.  ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी (black widow spider) चावल्याने सामान्य माणूस स्पायडरमॅन होतो हे त्यांनी चित्रपटात पाहिलं होतं. त्यानुसार त्यांनी एका ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी शोधून काढला. त्याच्याकडून त्यांनी सलग तीन दिवस चावून घेतलं. 


ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी हा अत्यंत विषारी मानला जातो. हा कोळी चावल्यानंतर अंगदुखी, पोटदुखी, चक्रर येणं, ह्रदायचे ठोके वाढणं अशी लक्षणं दिसू लागतात. काही वेळा माणूस बेशुद्धही होतो. पण या लहान मुलांना कोळी चावल्यावर काय परिणाम होतील हे माहित नव्हतं. त्यांनी केवळ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कोळी चावल्यावर माणूस स्पाडरमॅन होतो, हेच पाहिलं होतं. ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी चावल्याने या तीनही मुलांच्या अंगात विष पसरलं आणि ते बेशुद्ध झाले. घरच्यांनी ही गोष्ट कळताच त्यांनी तीनही मुलांना तात्काळ रुग्णालायत दाखल केलं. 


या तीनही मुलांच्या अंगात विष भिनलं होतं. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत या तिनही मुलांचे जीव वाचवले. पाच दिवसांनंतर या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेनंतर देशाच्या आरोग्य मंत्रालयाने पालकांनी आपल्या मुलांवर नीट लक्ष ठेवण्याची सूचना जारी केली आहे.


सुपरहिरोसारखी उडी मारली
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. विद्यार्थ्यांमध्ये सुपरहिरोवरुन लागलेल्या पैजेत एका मुलाने चक्क शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. या विद्यार्थ्याला (Student) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये ही  घटना घडली. कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला कानपूरच्या किदवई नगरातील एक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. 


शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाला बॉलिवूडचा एका सुपरहिरो खूप आवडत होता, आणि त्याच्यासारखा स्टंट करण्याच्या नादात मुलाने शाळेतून उडी मारली. ही संपूर्ण घटना शाळेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.