मुंबई : फळं हे आपल्या शरीरासाठी गरजे असतात. कारण ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यात आणि महत्वाचे घटक पुरवण्यात मदत करते. त्यामुळे आपण दिवसातून एक तरी फळ खातोच. काही वेळेला या फळांचे भाव वाढतात परंतु आपल्या शरीरासाठी उपयुक्त असल्याने लोकं त्यांना विकत घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्ही किती महागडे फळ आतापर्यंत घेतले आहे किंवा खाले आहे? तुमचे उत्तर प्रति किलो 100 ते 200 रुपयांपेक्षा जास्त नसावे. त्यात तुम्ही काही खास प्रकारचे फळ घेतले तर ते  जास्तीत जास्त 500 ते 700 रुपयांपर्यंत असू शकतो.


पण तुम्हाला जगातील सर्वात महाग फळांबद्दल माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला या फळांविषयी सांगणार आहोत, हे प्रति किलो लाखो रुपयांत मिळतात. तर यापैकी काही फळांची किंमत ही लक्झरी कार आणि बाईकपेक्षा ही जास्त आहे.



स्क्वेअर टरबूज : जगात फक्त गोलच नाही, तर चौकोणी टरबूजही आहेत. हे टरबूज चवदार आणि गोड असतात. याची चव खूपच सुंदर आहे. या चौकोणी टरबूजाची जोडी, सुमारे 2 लाख 26 हजार 837 रुपयांमध्ये विकली जाते. या एक टरबूडाचे वजन साधारण पाच किलो किंवा त्यापेक्षा अधिक असते. खरेतर या टरबूजाला चौरस आकार मिळण्यासाठी त्याला एका चौकोणी पेटीच्या आत ठेवले जाते, ज्यामुळे त्यांचा आकार चौकोणी बनतो.



ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन): हा आंबा जगातील सर्वात महाग आंबा असल्याचे सांगितले. हे जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळते जाते आणि नंतर ते देशभर विकले जाते. या एक किलो आंब्याची किंमत तीन लाख रुपयांहून अधिक आहे.



युबरी खरबूज : जपानचे युबरी खरबूज हे जगातील सर्वात महागडे फळ आहे. हे विशेष फळ जपानमध्ये घेतले जाते. मुख्यता हे जपानच्या युबरी भागात घेतले जातात. 2019 मध्ये या खरबूजांच्या एका उत्पन्नाचा लिलाव 33 लाखांवर झाला होता. इतक्या पैशात आपण भारतात एक उत्तम कार खरेदी करू शकतो.



रूबी रोमन द्राक्ष : जपानमधील द्राक्ष हे जगातील सर्वात महाग फळांपैकी एक आहे. मागील वर्षी या द्राक्षाचा फक्त एक गुच्छ 7.50 लाख रुपयांना विकला गेला, त्यात 24 द्राक्षे होती. महागडे असल्यामुळे त्याला 'श्रीमंतांचे फळ' म्हणतात.



हेलीगन अननस: हे पिवळ्या रंगाचे दिसणारे अननस जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक आहे. हे केवळ ब्रिटनमधील हेलीगनच्या बागांमध्ये वाढतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ एका अननसाची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे.