ती तिथे तो.... का अस्वलासोबतच राहते ही सुंदर मुलगी?
![ती तिथे तो.... का अस्वलासोबतच राहते ही सुंदर मुलगी? ती तिथे तो.... का अस्वलासोबतच राहते ही सुंदर मुलगी?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2021/09/01/447313-rsath.png?itok=mOGrHPVI)
ही भलतीच आवड बुवा...
नवी दिल्ली : तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत का, असं विचारलं असता उत्तर होकारस्वरुपात आलं तर कुत्रा, मांजर, गाय, बैल, शेळी, मेंढी अशा प्राण्यांची नावं घेतली जातात. पण, सध्या एका सुंदर मुलीची भयंकर चर्चा होऊ लागली आहे, कारण ठरतंय ते म्हणजे या मुलीनं पाळलेल्या एका प्राण्याची, जो अनेकदा तिच्या पार्टनरच्याही रुपाच दिसतो.
सोशल मीडियावर तुफान चर्चा होणाऱ्या या मुलीचं नाव आहे वेरोनिका डिचका (Veronika Dichka). मुळच्या रशियाच्या असणाऱ्या वेरोनिकानं आर्ची नावाचं एक जंगली अस्वल पाळलं आहे.
वेरोनिकासाठी आर्ची फारच खास आहे. सोशल मीडियावरचे फोटो पाहून हे लक्षात येत आहे. जिथं ती चक्क या अस्वलासोबत कारमधून ड्राईव्हलाही जाताना दिसत आहे. अस्वलाला पाहून तुमच्याआमच्यासारख्यांना धडकीच भरेल. पण, ही वेरोनिका मात्र त्याच्यासोबत अशी वावरतेय जणू काही तो तिचा बालमित्रच.
आर्चीला ती आपला मुलगा आणि खास मित्र, खास पार्टनर मानते. आर्ची आपल्याला आईसारखा वागवतो असं तिचं मत. तो कायमच तिच्यासोबत असतो, मुख्य म्हणजे कशाचीही भीती वाटल्यास हा आर्ची तिच्यामागं लपतोही. ती आर्चीला कधीच एकटं सोडलं नाही.
कधी झाली भेट?
2019 मध्ये वेरोनिका या अस्वलाला भेटली होती. सफारी पार्कमध्ये तिनं एका अस्वलाचा जीव वाचवला होता. तेव्हापासूनच या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतोय असं म्हटलं जात आहे. वेरोनिका आणि या अस्वलाची ही मैत्री आणि त्यांचं खास नातं आहे की नाही जगावेगळं पण जगात भारी?